|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » देशमुखांची कामे व अनुभवाला न्याय द्या

देशमुखांची कामे व अनुभवाला न्याय द्या 

            प्रतिनिधी/ सातारा

दुष्काळी माणदेशात क्रांती करायची असेल, तर जलपूत्र प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन न्याय द्यावा, तसेच त्यांच्या कामांचा व अनुभवाचा लाभ जनतेला मिळावा, अशी अपेक्षा माढा लोकसभा मतदार संघातून होऊ लागली आहे.

माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला, माण, फलटण हे दुष्काळी मतदारसंघ आहेत. एकवेळ राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. मात्र, पवारसाहेबांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना तितकेशे लक्ष देता आले नाही, ही बाब खरी आहे. प्रभाकर देशमुख यांनी सनदी अधिकारी म्हणून काम करताना पहिल्याच वर्षी आपल्या लोधवडे गावाला सुधारण्याचा निर्णय घेतला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. लोधवडे महाराष्ट्रात पहिले आले. या त्यांच्या कामाचा अनुभवाचा उपयोग माढा मतदारसंघाच्या कायापालट होण्यासाठी होऊ शकतो, पेंद्रातून नवनवीन योजना आणून त्या राबवण्याची कुवत देशमुख यांच्यात आहे. तसेच प्रशासनातील बारीक-सारीक माहिती असल्याने व शरद  पवार यांच्या समवेत कामकेल्याने मतदारसंघातील लोकांना नेमके काय हवे याची त्यांना जाण आहे.

जलयुक्त शिवार हा प्रभाकर देशमुख यांचा वीकपॉईंट आहे. जलयुक्त शिवार व वॉटर कप यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अवघ्या माणवासियांना माहित आहेत. पाण्यासंदर्भात देशमुख यांनी केलेल्या कार्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरद पवारसाहेब  यांच्या ते जवळचे झाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, डॉ. अब्दूल कलाम यांच्या सारख्या थोर विभुतींच्या हस्ते त्यांचा गौरव ही झाला आहे. त्यामुळे माढय़ातून त्यांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यावी, अशा प्रतिक्रीया सर्व तालुक्यातून होत आहेत.