|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » बीडमध्ये पेट्रोल पंपावरून सात लाखांच्या डिझेलची चोरी

बीडमध्ये पेट्रोल पंपावरून सात लाखांच्या डिझेलची चोरी 

ऑनलाईन टीम / बीड  :

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. त्यातच बीडमध्ये चोरटय़ांनी चक्क नऊ हजार लिटर डिझेलची चोरी केली. विशेष म्हणजे पेट्रोल पंपाचे उद्याटन अद्याप झालेले नाही. अंडरग्राऊंड टँकला मोटार लावून चोरटय़ांनी सात लाख रूपयांचे डिझेल लुटले.

बीडमधील माजलगाव-परभणी रोडवर पवारवाडीमध्ये किशोर उनवणे यांचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाचं उद्याटन दसऱयाला करायचे नियोजित होते. गेल्या वर्षभरापासून या पेट्रोल पंपाच्या उभारणीचे काम सुरु होते. मात्र या चोरीमुळे या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाचा मुहूर्त दिवाळीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे.

 

पेट्रोल पंपाचा परवाना मिळाला की कंपनी टेस्टिंगसाठी बारा हजार लिटर डिझेल पंप चालकाला देते. त्यामुळे पंप चालकाने मार्चपूर्वी बारा हजार लिटर डिझेल या टकमध्ये ठेवलं होते. गेल्या सहा महिन्यांपासून हे डिझेल टँकमध्ये सुरक्षित होते. मात्र अचानक रात्री चोरटय़ांनी मोठय़ा शिताफीने डिझेल चोरले. यासाठी चक्क मोटारीचा वापर करण्यात आला.

चोरटय़ांनी इतक्मया शिताफीने डाव साधला, की पेट्रोल पंपाच्या रक्षणासाठी असलेल्या निद्रिस्त सुरक्षारक्षकांना समजलंही नाही. नऊ हजार लिटर डिझेल चोरुन न्यायचं, ही छोटी गोष्ट नाही. तब्बल अडीच ते तीन तासापर्यंत चार ते पाच माणसं या पेट्रोल पंपाच्या बाजूला बसवून डिझेल भरत होती. डिझेल घेऊन चोर पसार झाल्यावर सकाळी ही घटना पंप चालकाच्या लक्षात आली.

 

Related posts: