|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » सेलच्या सुरुवातीलाच फ्लिपकार्टने विकले 10 लाख स्मार्टफोन

सेलच्या सुरुवातीलाच फ्लिपकार्टने विकले 10 लाख स्मार्टफोन 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

देशातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल वस्तूची विक्री करणाऱया कंपनीकडून नवीन सेलची गुरुवारी सुरुवात केली आहे. यात कंपनीकडून एक तासाच्या कालावधीत 10 लाख स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. यात जवळपास 1 हजार कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली असल्याची नोंद यावेळी करण्यात आली.

या विक्रीनंतर कंपनीने आपली सर्वात मोठी विक्री असल्याचा दावा केला आहे. यातून आम्ही नवीन विक्रम तयार करणार असल्याचे मत नोंदवले आहे. तर सेलच्या दुसऱया दिवशी 30 लाख स्मार्टफोनची विक्री झाली. हाच आकडा मागील वर्षात एकूण पाच दिवसाच्या कालावधीत 4,300 कोटी रुपयाची विक्री झाली असल्याचे सांगण्यात आले. हाच आकडा या वर्षात पहिल्या दोन दिवसातच पार केला असल्याचे म्हटले आहे. यात ऍमेझॉन इंडियाने म्हटले आहे की आम्ही या ध्येया पासून खुप लाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पेटीएम मॉलला 5 कोटी जणांनी व्हिजिट दिली आहे.

आम्ही एका तासात 10 लाख मोबाईल विकण्याचा आणि एका दिवसात 30 लाखाचा कमाईचा आकडा पार केला असून हा विक्रम कोणत्याही इतर रिटेल स्मार्टफोन विक्री करण्यात आली असल्याची नोंद करण्यात आली असल्याचे मत फ्लिपकार्टचे वरिष्ठ संचालक स्मृती रविचंद्रन यांनी व्यक्त केले आहे.