|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत सबनीस यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत सबनीस यांचे निधन 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा कोकण जनसंघाचे पूर्णवेळ प्रचारकाचे काम पाहणारे वसंत सबनीस यांचे वयाच्या 83 व्या वर्षी दि. 14 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वा. परभणी महाराष्ट्र येथे निधन झाले. निधन झाले. 1968 ते 78 या दहा वर्षासाठी त्यांनी जनता पक्ष गोवाचे संस्थापक सदस्य म्हणूनही काम पाहिले होते. गोव्यात 20 वर्षे त्यांनी आपले कार्य केले. पणजी, पर्वरी या ठिकाणी ते राहत होते. सबनीस यांनी विद्यमान केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना घडविले. गोव्यात आज भाजप जो रुजला आहे तो रुजविण्यात त्यांचे कार्य फ्ढार मोठे आहे.

वसंत सबनीस यांच्या पश्चात दोन मुले राजू व हेमंत, सुना स्वाती, दीपाली, मुलगी प्रज्ञा, जावई संजीव व तीन नातू असा परिवार आहे. त्यांचा लहान मुलगा फ्ढाsंडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज राज्यकर्त्यांना पाहिले तर ते खुर्ची, खुर्ची आणि खुर्ची असा खेळ खेळतात. आजच्या पार्श्वभूमीवर अशी माणसे होती यावर कुणी विश्वासही ठेवणार नाही परंतु सबनीस हे प्रखर देशाभिमानी होते. त्यांने जनता पक्षाचे संघटनमंत्रीपद आणि भाजप स्थापनेनंतर भाजपचे महामंत्री म्हणून धुरा सांभाळली. त्यांनी गोव्यात भाजप रुजविण्यासाठी गोव्यात सर्वत्र प्रवास केला व कार्यकर्ते घडविले. भाजपचे अस्तित्व काय असेल यांचा विचार त्यांनी कधीच केला नाही तर आपले काम आपण करत राहीले पाहिजे अशा मताचे ते होते.

वसंत सबनीस यांचे कार्य प्रेरणादायी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

भाजपच्या प्रतिकूल परिस्थितीत काम करणारे व ज्यावेळी भाजपला लोक जवळ करत नव्हते अशाप्रसंगी त्यांनी भाजपसाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता काम केले. जी मंडळी सत्तेशीवाय राहू शकत नाही त्यांनी वसंत सबनीस यांचा आदर्श घ्यावा. आपल्या ध्येयवादाला प्रेरित होऊन काम करणारे आजच्या जगात कमीच मिळतात त्यातली एक व्यक्ती म्हणजेच सबनीस. गेल्यावर्षी ते आपल्या मुलाला घेऊन आपल्याला हरमल येथे निवासस्थानी भेटायले आले होते. त्यांचा हा उत्साह वाखडण्यासारखा आहे. त्यांचे कार्य हे प्रेरणादायी आहे व सबनीस यांच्या निधनाने आपले आदर्श हरवले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रतिकखिया माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली.

गोव्यात भाजप वाढविण्याचे काम सबनीसांनी केले : राजेंद्र आर्लेकर

माजी मंत्री तथा उपसभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले की, त्यांनी भाजपसाठी पूर्णवेळ संघटनमंत्री म्हणून काम केले आहे. गोव्यात पक्षाचे काम वाढविण्याचे काम त्यांनी केले तसेच कार्यकर्ते शोधून काढणे आणि त्यांना योग्य जबाबदारी देणे हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. त्यांचे भाजप गोव्यासाठी खूप मोठे योगदान आहे. भाजप पक्षाने त्यांचे स्मरण केले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.