|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » कोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको : शशी थरूर

कोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको : शशी थरूर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राम मंदिरसंदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वादग्रस्त विधन केल आहे. कोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको आहे. हिंदू लोक अयोध्येत भगवान रामाचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे कोणत्याही ख-या हिंदू व्यक्तीला दुस-याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधले जावे, असे वाटणार नाही. चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ’’द हिंद लिट फॉर लाइफ डायलॉग 2018’’मध्ये शशी थरूर बोलत होते. त्यानंतर भाजपानंही शशी थरूर यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

अयोध्येत राम मंदिर तयार होऊ नये, यासाठी काँग्रेस नेते असे वादग्रस्त विधनं करत असतात. ते जाणूनबुजून एका समुदायाला संदेश देऊ इच्छतात की, राम मंदिर पुनर्निर्माण होऊ नये, असं भाजपा नेते नरसिंहा म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजिद मेमन यांनी शशी थरूर यांच्या विधनाचे समर्थन केले आहे. तर विश्व हिंदू परिदषेचे सुरेंद्र जैन यांनी शशी थरूर यांच्या विधनावर टीका केली आहे. मुस्लमि पर्सनल लॉ बोर्डाला चुचकारण्यासाठीच काँग्रेस नेते अशी विधनं करतात.

 

’द पॅराडॉक्सयिल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाले. याच पुस्तकासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्वटि केले होते. या ट्वटिमध्ये त्यांनी अशा एका इंग्रजी शब्दाचा वापर केला होता, जो पाहता केवळ त्याचा अर्थ समजणं तर दूरच राहिले. साध त्याचा उच्चार करणंदेखील युजर्सना कठीण झालंय. परिणामी, या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी युजर्सनी डिक्शनरीची मदतही घेतली. पण उपाय शून्यच कारण याचा अर्थ काही केल्या सापडेना.

 

Related posts: