|Friday, May 24, 2019
You are here: Home » क्रिडा » अफगाणच्या हझरतुल्लाचे एका षटकांत सहा षटकार

अफगाणच्या हझरतुल्लाचे एका षटकांत सहा षटकार 

वृत्तसंस्था/ शारजा

अफगाणचा आक्रमक फलंदाज हझरतुल्ला झेझाईने येथे रविवारी झालेल्या अफगाण प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेतील  सामन्यात एका षटकात सहा षटकार खेचले.

काबुल झेवानेन आणि बालेख लिजेंड्स यांच्यातील हा सामना खेळविला गेला. काबुल संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱया झेझाईने प्रतिस्पर्धी संघातील फिरकी गोलंदाज अब्दुल्ला मेझारीच्या षटकात सहा षटकार खेचले. या षटकात मेझारीने एक चेंडू वाईड टाकल्याने त्याने या षटकात 37 धावा दिल्या. एका षटकात सहा षटकार मारणाऱया फलंदाजामध्ये विंडीजचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स, रविशात्री, हर्षल गिब्ज आणि युवराज सिंग यांचा समावेश होता. आता या यादीत झेझाईचा समावेश करण्यात आला आहे. हझरतुल्लाने या सामन्यात 12 चेंडूत अर्धशतक झळकविले. 2007 च्या विश्वचषक टी-20 स्पर्धेत इंग्लंडच्या ब्रॉडच्या एका षटकांत युवराज सिंगने सहा षटकार खेचताना 12 चेंडूत अर्धशतक झळकविले होते. 20 वर्षीय झेझाईने आक्रमक फलंदाजी करूनही त्याच्या काबुल संघाला पराभव पत्करावा लागला. बालेख लिजेंड्स संघाने हा सामना 21 धावांनी जिंकला. काबुल संघाकडून विजयासाठी 245 धावांचे आव्हान बालेख संघाला मिळाले. बालेख संघातील सलामीच्या गेलने 48 चेंडूत 10 षटकारांसह 80 धावा झोडपल्या. बालेख संघाने 20 षटकांत 6 बाद 244 धावा केल्या. त्यानंतर काबुल संघाने 20 षटकांत 7 बाद 223 धावा जमविल्या.

Related posts: