|Saturday, March 23, 2019
You are here: Home » क्रिडा » अमेरिकेची स्टिफेन्स अंतिम स्पर्धेसाठी पात्र

अमेरिकेची स्टिफेन्स अंतिम स्पर्धेसाठी पात्र 

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

अमेरिकेची महिला टेनिसपटू स्लोनी स्टिफेन्सने सिंगापूरमधील डब्ल्यूटीए टूरवरील 2018 च्या टेनिस हंगामातील होणाऱया अंतिम स्पर्धेसाठी आपले तिकिट आरक्षित केले आहे.

सदर स्पर्धा सिंगापूरमध्ये 21 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार असून या स्पर्धेत निवडक आठ महिला टेनिसपटूंमध्ये जेतेपदासाठी लढत होईल. 70 लाख डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील सामने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविले जातील. या स्पर्धेत  रूमानियाच्या हॅलेप, जर्मनीची केर्बर, जपानची ओसाका, झेकची क्विटोव्हा, डेन्मार्कची कॅरोलिनी वोझ्नियाकी आणि अमेरिकेची स्टिफेन्स  अशा एकूण सहा टेनिसपटूंचा सहभाग निश्चित झाला आहे. स्विटेलिना आणि प्लिसकोव्हा या दोन टेनिसपटूंचा या स्पर्धेतील सहभाग जवळपास निश्चित झाला आहे.

Related posts: