|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘अरुणा’ प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार

‘अरुणा’ प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार 

मुंबईतील बैठकीत सकारात्मक चर्चा : आंदोलन थांबविण्याचे संकेत

वार्ताहर / वैभववाडी:

अरुण खोरे प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी कोकण भवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सहानुभूतीपर्वक विचार करून त्यांना न्याय देण्यात येईल, असे शासनाकडून आश्वासित केल्याने गेले महिनाभर आखवणे सुरू असलेले उपोषण, ठिय्या आंदोलन थांबणार आहे.

आखवणे येथे अरुणा खोरे मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी अरुणा खोरे संघर्ष समितीने मागील महिनाभर उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या मध्यस्थीने मागील 15 दिवसांपूर्वी उपोषण मागे घेण्यात आले. 15 ऑक्टोबरला कोकण भवन येथे उच्चस्तरीय बैठक घेऊन आपले प्रश्न सोडविण्यात येथील, असे आश्वासन भंडारी यांनी दिले होते. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी उपोषण मागे घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 15 ऑक्टोबरला कोकण भवनात पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, कोकण आयुक्त जगदीश पाटील, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टेप्रांताधिकारी मंगेश जोशी, पुनर्वसन अधिकारी डावरी, प्रांताधिकारी नीता सावंत, रंगनाथ नागप, संजय नागप, शिवाजी बोंद्रे, भाई कदम, विकास चव्हाण यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली.

विविध मागण्यांवर चर्चा

यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विवरण पत्रातील त्रुटींचा अहवाल लवकरात लवकर तयार करणे, प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात शेतजमीन देण्याचा प्रस्ताव तयार करणेप्रकल्पग्रस्तांच्या घरांचे फेरमूल्यांकन करणे, याचा अहवाल तात्काळ सादर करणे, पुनर्वसन गावठणातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करणे, बोगस प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकारी व लाभार्थी यांच्यावर कारवाई करणे, शासकीय नोकरी किंवा दहा लाख देणे, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देणे, याबाबत अधिकाऱयांसोबत चर्चा घडवून आणली. अधिकाऱयांच्या या भूमिकेमुळे संघर्ष समिती पदाधिकाऱयांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी संघर्ष समितीचे रंगनाथ नागप म्हणाले, मुंबईहून गावी येऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून त्यांना झालेल्या चर्चेसंबंधी सर्व माहिती देण्यात येईल. त्यानंतर गेले महिनाभर सुरू असलेले उपोषण थांबणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.