|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » 74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो

74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो 

सर्वेमधून माहिती उघड : प्रबळ क्षेत्रातील कंपन्यांची उत्तुग भरारी : चार महत्वाच्या उद्योगाचा समावेश 

वृत्तसंस्था/ मुंबई

74 भारतीय कंपन्यांनी जर्मनीत एका वर्षात 11 अब्ज युरो इतका महसुल कमावला असल्याची माहिती एका सर्वेमधून नोंदवण्यात आली आहे. यात 23हजार 300 कर्माचारी काम करत असल्याचे म्हटले आहे. ही माहिती ‘इंडियन इन्वेस्टमेन्ट इन जर्मनी 2018’ या अहवालात नोंदवण्यात आली आहे.

सदर सर्वेसाठी इन्डो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इतर चार प्रबळ क्षत्रामध्ये एकत्रितपणे जवळपास 95 टक्के इतका महसुल भारतीय कंपन्यानी कमावला असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.

74 कंपन्यामध्ये 23 हजार 300 कर्मचारी कार्यरत आहेत. तर यातील 213 कर्मचारी कायमचे नोंदणीकृत असून ते जवळपास सर्व यंत्रणा हाताळत असतात. प्रबळ उद्योग क्षेत्रामध्ये धातु आणि धातूवर प्रक्रिया करणारे उद्योग , केमिकल्स, औषध आणि इतर सेवा क्षेत्र विज्ञान तंत्रज्ञान विषय सेवा देणारी क्षेत्र आदीच्या एकत्रित करण्यात येणाऱया महसूलातून अब्ज युरोचा टप्पा पार करण्यात भारतीय कंपन्या यशस्वी झाल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे.