|Sunday, August 25, 2019
You are here: Home » क्रिडा » डिव्हिलीयर्स पुन्हा खेळताना दिसणार

डिव्हिलीयर्स पुन्हा खेळताना दिसणार 

वृत्तसंस्था / प्रेटोरिया

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलीयर्सचे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱया आगामी मिझेन्सी सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत डिव्हिलीयर्ससह अन्य अव्वल क्रिकेटपटू भाग घेणार असल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रवक्त्याने सांगितले.

या सुपरलीग टी-20 स्पर्धेत डिव्हिलीयर्स, आमला, डु प्लेसिस, रबाडा, डुमिनी, इम्रान ताहीर यांचा समावेश राहणार आहे. विंडीजचा ख्रिस गेल, डव्ने ब्रॅव्हो, अफगाणचा रशीद खान, इंग्लंडचे रॉय, मॅलेन आणि मॉर्गन सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 16 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डिव्हिलीयर्सने 114 कसोटी, 228 वनडे आणि 78 टी-20 सामने खेळले असून त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 20,014 धावा जमविल्या असून कसोटीत त्याने 8765, वनडेत 9577 आणि टी-20 मध्ये 1672 धावा जमविल्या आहेत.