|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वडगावात भगवी दौड

वडगावात भगवी दौड 

10 हजारांहून अधिक शिवभक्तांचा सहभाग

प्रतिनिधी/ बेळगाव

डोक्मयाला भगवा फेटा बांधलेले हजारो शिवभक्त आणि त्यांच्या स्वागतासाठी सज्ज नागरिक अशा वातावरणात मंगळवारी वडगावात संपूर्णपणे भगवी दौड पहावयास मिळाली. पहाटेपासूनच दारोदारी रांगोळय़ा काढुन आणि फुलांची उधळण करीत वडगावासीयांनी दौडचे जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी उभारलेल्या कमानी आणि पारंपरिक पेहरावातील शिवभक्तांनी लक्ष वेधून घेतले. 32 मण सुवर्णसिंहासनासाठी तर मोठय़ा प्रमाणात मदत या दौडीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

बेळगावच्या उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या हस्ते पूजन व ध्वजचढवून खासबागच्या दुर्गामाता मंदिरातून दौडची सुरुवात झाली. नगरसेवक मनोहर हलगेकर, रतन मासेकर, युवा कार्यकर्ते रवी साळुंखे यावेळी उपस्थित होते. भगव्या फेटय़ांसह उपस्थित तरुण, बाल आणि युवतींनी पहाटेच्या प्रकाशात दौडची शोभा आणखीनच वाढविली. उपस्थितांना फेटे बांधण्यासाठी राबणारे शिवप्रति÷ानचे हात यावेळी आणखीनच जोरदार चालत होते. हजारोंच्या संख्येने डोईला फेटा बांधून दौडीत सहभागी होत छत्रपती शिवरायांचा जयघोष केला.

दुर्गामाता मंदिर खासबाग, येथून सुरु झालेली ही दौड भारतनगर  क्रॉस क्रमांक 1, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगाम्मा मंदिर, भारतनगर (हमाल गल्ली) भारतनगर 5 क्रॉस, 4 क्रॉस, रयत गल्ली, ढोरवाडा, सफार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, मारुती मंदिर तेंग्गिन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ गल्ली,  कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नूरकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प क्रॉस नं. 3, हरिजनवाडा, हरिमंदिर,  विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजी नगर, पाटील गल्ली आदी मार्गे गेली. शेवटच्या टप्प्यात मंगाई मंदिर येथे सारे जण जमले होते.

उपमहापौर मधुश्री पुजारी संपुर्ण दौडकाळात सहभागी झाल्या. यामुळे त्यांच्याच हस्ते मंगाई मंदिरात आरती करुन ध्वज उतरविण्यात आला. यावेळी मंगाई मंदिरासमोरील पटांगणात शिवभक्त मोठय़ा संख्येने जमले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करुन दौडीची सांगता करण्यात आली. यानंतर अतिशय शिस्तबध्द वातावरणात शिवभक्त आपापल्या घरी परतत होते.

वडगाव भागात दौडीचे मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. पहाटेपासूनच दौडीच्या संपूर्ण मार्गावर नागरिक उभे होते. संपूर्ण गल्लीत रांगोळय़ा काढुन आणि फुलांनी त्या रांगोळय़ा सजवून दौडीला मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला होता. प्रत्येकाच्याच चेहऱयावर उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. दौड आपल्या भागातून येणार याचा उत्साह अवर्णनिय असाच होता. महिलावर्गांनी ठिकठिकाणी आरती करुन स्वागत केले.

दौडीत एकतेचे दर्शन

रेणू मोरे या गेल्या अनेक वर्षांपासून या दौडीत सहभागी होतात. या दौडीमुळे एकतेचे दर्शन घडते, अशी माहिती त्यांनी दिली. दौडीत सहभागी होणाऱयांना देशभक्ती आणि धर्माबद्दल श्रध्दा निर्माण होते. तसेच एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण होते, अशी माहिती त्यांनी दिली.

सतत सहभागी होत राहणार

पूजा बाळेकुंद्री या युवतीने आपण सतत सहभागी होतच राहणार असे सांगितले. सकाळच्या वेळी घरासमोर रांगोळी घालून दौडीत सहभागी होताना एक वेगळीच उर्जा निर्माण होते. इतरवेळी कोणी इतर काय करतायेत याची काळजी घेत नाहीत. मात्र दौडीत प्रत्येकाला सामावून घेत पुडे धावण्याची शिकवण मिळते, असे तिने सांगितले.

मंगळवारी यांनी दिला कर्तव्यनिधी

सुवर्णसिंहासन मोहीमेत कर्तव्यनिधी देणाऱयांची संख्या वाढत आहे. मंगळवारी वडगाव भागातील दौडीत याला मोठा प्रतिसाद मिळाला.

स्वतः उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी 5001, एस. एम. खन्नुकर 5001, शरयु युवराज पाटील 3200, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोनार गल्ली 11111, शुभम रोहन पांचाळ 1001, मनोहर ठाणू कंग्राळकर 1111, रमेश परदेशी 5001, संदीप कृष्णा हुंदरे 11111, परशराम घाडी 11111, गंगाधर माचिकर यांनी 5555 असा निधी दिला आहे.

प्रकाश शेलार व निवृत्ती फर्जंद येणार

बुधवार दि. 17 रोजी होणाऱया दौडीत शेलारमामा यांचे वंशज प्रकाश शेलार व  शिरीश शेलार तर कोंडाजी फर्जंद यांचे वंशज निवृत्ती फर्जंद उपस्थित राहणार आहेत. त्यांना पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होणार आहे. कोंडाणा गडावरील पराक्रमाने शेलारमामा साऱयांनाच पूजनीय आहेत. तर कोंडाजी फर्जंद यांच्या जीवनावरील फर्जंद हा चित्रपट नुकताच येवून गेला आहे. यामुळे त्यांच्या वंशजांना पाहण्यासाठी मोठे औत्सुक्मय आहे.

गुरुवार  दि. 18 चा मार्ग

श्री मारुती मंदिर मारुती गल्ली ते धर्मवीर संभाजी चौक

श्री मारुती मंदिर मारुती गल्ली येथून दौडीस प्रारंभ होणार आहे. नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनसूरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खुट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, कंग्राळ गल्ली, मागील बाजू, सरदार्स ग्राऊंड रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, काली आंमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड आदी मार्गे जाऊन धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता होणार आहे.

Related posts: