|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संकेश्वर, निपाणीत दुर्गादौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

संकेश्वर, निपाणीत दुर्गादौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

प्रतिनिधी/ संकेश्वर

येथे रोज दुर्गामाता दौड काढण्यात येत असून त्यामध्ये युवावर्ग मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. दौडीच्या मार्गावर घराघरांसमोर रांगोळय़ा काढण्यात येत आहेत. तसेच मार्ग फुलांनी सुशोभित करण्यात येत आहे. मंगळवारी शंकरलिंग मठात संजय नष्टी दाम्पत्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शस्त्राचे व भगव्या ध्वजाचे पूजन करुन दौडीस प्रारंभ केला.

शंकरलिंग मठापासून बेळवी गल्ली, परीट गल्ली, मड्डी गल्ली, संसुद्धी गल्ली, कासार गल्ली, चावडी, गाडगी गल्ली ते भवानी मंदिर या परिसरातील नागरिकांनी ध्वजावर पुष्पवृष्टी केली. यावेळी जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय, दुर्गा माता की जय, भवानी माता की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, भगवा ध्वज की जय, शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, बसवेश्वर महाराज की जय, विरराणी कित्तूर चन्नम्मा की जय अशा घोषणा देण्यात आल्या. बुधवारी शंकरलिंग मठ, नवी गल्ली, अंबिका नगर, मड्डी गल्ली, चनगौडा गल्ली, औरनाळ गल्ली, बिरदेव मंदिर ते भवानी मंदिर यामार्गावरुन दौड काढण्यात येणार आहे.

निपाणीत दुर्गादौडीचा उत्साह

निपाणी : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त निपाणी शहर व उपनगरात दुर्गामाता दौडीचा उत्साह कायम असल्याचे दिसून येत आहे. विविध ठिकाणी दुर्गादौडचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.

दुर्गादौडीच्या सहाव्या दिवशी माजी मुख्याध्यापक सुभाष कदम व युवा उद्योजक संजय चिकोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे तसेच ध्वजपूजन, शस्त्रपूजन करण्यात आले. यानंतर वागळे गल्ली, आडके प्लॉट, संयुक्त भीमनगर, भीमनगर, जामदार प्लॉट, खराडे गल्ली, चव्हाणवाडी, बेल्लद गल्लीमार्गे परत छत्रपती शिवाजी चौकात आली. यावेळी नगरसेवक संजय पावले यांनी दौडचे स्वागत केले. यावेळी सचिन देसाई, बापू इंगवले, राजू परिट, अंजना येजरे, अरुणा बिद्रे, नंदीनी क्षीरसागर, शशिकांत मोरे, अनिल बलुगडे, प्रशांत क्षीरसागर, गंगाधर जाधव, उदय दिवटे यांच्यासह शिवप्रेमी महिला उपस्थित होत्या.