|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » ‘होंडा ऍक्टिव्हा’ दिवसेंदिवस लोकप्रिय

‘होंडा ऍक्टिव्हा’ दिवसेंदिवस लोकप्रिय 

नवी दिल्ली

 ऍक्टिव्हा या भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱया टू-व्हीलर ब्रँडने आणखी एक मैलाचा टप्पा साध्य केला असल्याचे होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने जाहीर केले. होंडाची वैशिष्टय़पूर्ण ऍक्टिव्हा ही 2 कोटी ग्राहकांचा ऐतिहासिक टप्पा साध्य करणारी भारतातील पहिली स्कूटर ठरली.

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनोरू कातो यांनी ही घोषणा केली. 2 कोटी भारतीय ग्राहकांचे आभार मानताना ते म्हणाले की, 18 वर्षात व 5 पिढय़ांमध्ये होंडा टू-व्हीलर्स इंडियाने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि ऍक्टिव्हा ही भारतातील टू-व्हीलर ग्राहकांची सर्वात पसंतीची स्कूटर बनवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. ऍक्टिव्हाने भारतातील 2 कोटी कुटुंबांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी सहयोग दिल्याचे आम्हाला समाधान व आनंद आहे. भारतीयांची ऍक्टिव्हा असलेली पसंती वाढतच असून, आम्ही नवी आव्हाने स्वीकारण्यासाठी व ग्राहकांना आनंद देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.