|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » अरुधंती भट्टाचार्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर नियुक्ती

अरुधंती भट्टाचार्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर नियुक्ती 

मुंबई

 रिलायन्स इंडस्ट्रीजने स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या माजी संचालिका अरुधंती भट्टाचार्या यांची रिलायन्स कंपनीने आपल्या संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे. बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱया पहिल्या महिला संचालिका आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये दुसऱया महिला संचालक मंडळावर त्या येणार आहेत. निता अंबानी 2014 पासून संचालिका म्हणून नवीन कंपन्याचा कारभार पाहात आहेत. तर भट्टाचार्या यांची नियुक्ती 17 ऑक्टोबर 2018 पासून करण्यात येणार आहे. तर ही नियुक्ती पुढील पाच वर्षाच्या कालावधीकरिता करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. कंपनीचा कायदेशीर, व्यवस्थापकीय, बँकिंगसह इतर महत्वाचा कारभार त्यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचेही म्हटले  आहे. नवीन कंपनी कायद्यानूसार एका महिला संचालकांची नियुक्ती संचालक मंडळावर करण्यात यावी अशा नियम असल्यामुळेही असा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.