|Friday, August 23, 2019
You are here: Home » leadingnews » रावण दहन पाहत असतांना लोकांवर ट्रेन चढली ; 50 जणांच्या मृत्यूची भीती

रावण दहन पाहत असतांना लोकांवर ट्रेन चढली ; 50 जणांच्या मृत्यूची भीती 

ऑनलाईन टीम / अमृतसर :

पंजाबमधील अमृतसरमध्ये भीषण अपघात झाला आहे. रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असलेल्या लोकांवर टेन चढली, ज्यामध्ये 50 जण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेल्वेकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र रेल्वे आणि पोलिसांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आलेले आहे.

रेल्वे रुळावर उभे राहून लोक रावण दहनाचा कार्यक्रम पाहत होते, अशी माहिती आहे. जालंधरहून अमृतसरला जाणाऱया टेनने या लोकांना उडवले. अमृतसरच्या जोडा फाटकजवळ हा रावण दहनाचा कार्यक्रम साजरा केला जात होता. कार्यक्रम सुरु असतानाच अचानक रेल्वे आली आणि रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवले. मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण उत्सवाच्या वेळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे.