|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रोणापाल येथे वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू

रोणापाल येथे वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू 

वार्ताहर / बांदा:

 रोणापाल भरडवाडी येथील जानकी लक्ष्मण परब (65) यांचा रविवारी सकाळी विहिरीत कोसळून मृत्यू झाला. याबाबत पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 जानकी परब या रविवारी सकाळी 6 वाजता प्रात:विधीसाठी गेल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला तरी त्या न परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसला. काळोखात वाटेचा अंदाज न आल्याने त्या कठाडा नसलेल्या विहिरीत कोसळल्या असाव्यात, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पती लक्ष्मण परब यांनी घटनेची खबर पोलिसांना दिली. पोलीस हवालदार बापू झोरे व हेमंत पेडणेकर यांनी पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related posts: