|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » देशाच्या उत्पन्न करातील अर्धा हिस्सा महाराष्ट्र-दिल्लीचा

देशाच्या उत्पन्न करातील अर्धा हिस्सा महाराष्ट्र-दिल्लीचा 

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सर्वात जास्त उत्पन्न कर भरणा करणाऱया राज्यांच्या यादीत महाराष्ट्र उच्च स्थानी आहे. तसेच देशाचे अर्धे उत्पन्न कर महाराष्ट्राबरोबर दिल्ली सुद्धा मिळून देत आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) उत्पन्न कर आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर ज्या राज्यात जितक्या जास्त कंपन्या आहेत त्याठिकाणाहून जास्त कर जमा होत आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये उत्पन्न कर जमा करण्यात आलेल्या वाढीत पूर्वोत्तर राज्यांनी भारतात बाजी मारली आहे.

आर्थिक वर्ष 2017-18

मध्ये जमा आयकर

(आकडेवारी टक्क्यांत)

महाराष्ट्र……. 38.3

दिल्ली……… 13.7

कर्नाटक…….. 10.1

तामिळनाडू…. 6.7

गुजरात………. 4.5

 

आयकर जमा करण्यात

पुढे असलेली पूर्वोत्तर राज्ये

(आकडेवारी टक्क्यांत)

मिझोरम… 41.0

नागालँड… 32.1

सिक्कीम….. 26.0

त्रिपुरा…… 16.7

मेघालय 12.7