|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » वनप्लस 6टी भारतातील बाजारपेठेत दाखल

वनप्लस 6टी भारतातील बाजारपेठेत दाखल 

किंमत 40 हजार रुपयांपेक्षा अधिक असणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

वनप्लसने सोमवारी जागतिक सोहळय़ात अत्याधुनिक स्मार्टफोन वनप्लस 6टीचे सादरीकरण केले आहे. हा स्मार्टफोन न्यूयॉर्कमध्ये आयोजित समारंभात सादर करण्यात आला. वनप्लस 6टी भारतीय बाजारात मंगळवारी सादर केला गेला आहे. वनप्लस 6टी कंपनीच्या मागील वनप्लस 6 ची सुधारित आवृत्ती आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वॉटरड्रॉप नॉच, 3700 एमएएच बॅटरी आणि उत्तम कॅमेरा ही याची सर्वात आकर्षक वैशिष्टय़े आहेत. नवा वनप्लस 6टी सर्वार्थाने जुन्या स्मार्टफोनपेक्षा चांगला आहे यात शंकाच नाही.

वनप्लस प्रेमींसाठी…

किंमत : वनप्लस 6टीच्या 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरज (मिरर ब्लॅक व्हेरियंट)ची किंमत 549 डॉलर्स (सुमारे 40,300 रुपये) आहे. 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज मिरर ब्लॅक आणि मिडनाइट ब्लॅक व्हेरियंटची किंमत 579 डॉलर्स (42500 रुपये) आहे. तर 8 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज मिडनाइट ब्लॅक व्हेरियंटची किंमत 629 डॉलर्स (सुमारे 46200 रुपये) आहे.

डिस्प्ले : वनप्लस 6टीमध्ये 6.41 इंच फूल एचडी अधिक ऑप्टिक एमोलेड पॅनल आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शन आहे.

प्रोसेसर : वनप्लस 6टीमध्ये ऑक्टा-कोअर क्लालकॉम स्नॅपड्रगन 845 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी अड्रेनो 630 जीपीयू उपलब्ध आहे.

रॅम, स्टोरेज : वनप्लस 6 टीमध्ये 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमचा पर्याय मिळतो. वनप्लस 6 टी 128 जीबी आणि 256 जीबी व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

सॉफ्टवेअर

वनप्लस 6 टी मोबाईल डय़ुअल नॅनो-सिमकार्डसने कार्यान्वित होतो. हा अँड्रॉईड 9.0 पाय बेस्ड ऑक्सिजन ओएसवर चालतो.

कॅमेरा

वनप्लस 6 टीमध्ये डय़ुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. अपर्चर एफ/1.7, ओआयएस आणि ईआयएससोब 16 मेगापिक्सेल प्रायमरी आणि अपर्चर एफ/1.7 सोबत 20 मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स376के सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स371 सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी

वनप्लस 6 टीला ऊर्जा देण्यासाठी 3700 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून फास्ट चार्ज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानुमण्w 30 मिनिटांच्या चार्जिंगध्ये पूर्ण दिवसासाठी बॅटरी लाईफ मिळण्याचा दावा केला जातोय.