|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपा बैठका होण्याची चिन्हे धूसर

मनपा बैठका होण्याची चिन्हे धूसर 

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डची हद्द निश्चिती आणि मतदार याद्या तयार करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मतदान पेंद्र निश्चित करणे आदी विविध कामे चालणार आहेत. याकामी महापालिकेचे कर्मचारी आता दोन महिने व्यस्त राहणार आहेत. यामुळे आगामी काळात महापालिकेच्या बैठका होण्याची चिन्हे धूसर दिसू लागली आहेत.

महापालिका बैठक ऑगस्टमध्ये झाली होती. तसेच काही स्थायी समिती बैठका झाल्या. पण यापुढील बैठका होतील का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यापुर्वी महापालिकेच्या बैठका आयोजित करण्यासाठी अधिकाऱयांना वारंवार सुचना करण्यात येत होती. तरीदेखील कारणे देवून बैठक घेण्यास अधिकारी टाळाटाळ करीत होते. तसेच बैठक आयोजित करण्यात आल्यास अधिकारी गायब असतात. अशा विविध कारणामुळे बैठका घेण्यास अडथळे निर्माण होण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. मागील आठवडय़ात विविध स्थायी समिती बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. सभागृहाची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्याची सुचना कौन्सिल विभागाला करण्यात आली होती. पण महापालिका आयुक्त स्मार्टसिटी अभ्यास दौऱयावर गेले होते. त्यानंतर रजेवर आणि दसऱयाची सुट्टी होती. यामुळे महापालिका आयुक्त नसल्याने बैठक आयोजित करण्यात आली नाही. आता बैठक आयोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यापुर्वी ऑगस्ट महिन्यात बैठक झाली होती. यामुळे सर्वसाधारण बैठकीच्या विषय पत्रिकेवर विविध विषय आहेत. बैठक अनिश्चित असल्याने विषय प्रलंबित आहेत. पण आता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्यामुळे महापालिकेचे अधिकारी कामात व्यस्त झाले आहेत. यामुळे आगामी काळात बैठकाबाबत अनिश्चिती आहे.

 

Related posts: