|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रत्नागिरी कामगार कल्याणची ‘मॅडम’ प्रथम

रत्नागिरी कामगार कल्याणची ‘मॅडम’ प्रथम 

कामगार कल्याण मंडळाच्या महिला एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर

प्रतिनिधी / कणकवली:

कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूणच्या महिला एकांकिका महोत्सव स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र रत्नागिरीच्या ‘मॅडम’ एकांकिकेने प्रथम, कामगार कल्याण केंद्र कणकवलीच्या ‘पार्टनर’ने द्वितीय, चिपळूण-पोफळीच्या ‘मुलगी वाचवा’ एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील उर्वरित पारितोषिके अशी : उत्कृष्ट अभिनय – 1. मितल चव्हाण (रत्नागिरी), 2. साक्षी कोतवडेकर (रत्नागिरी), 3. कांचन खानोलकर (कणकवली). उत्कृष्ट दिग्दर्शन – 1. मनोज शिंदे (रत्नागिरी), 2. सुहास वरुणकर (कणकवली), 3. सुषमा देवळेकर (पोफळी-चिपळूण).

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी केंद्र संचालक संतोष नेवरेकर उपस्थित होते. नाटय़कर्मी श्यामसुंदर नाडकर्णी, अभय नेवगी, पल्लवी माळवदे, प्रा. हरिभाऊ भिसेंच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी श्रीधर भराडे, सुप्रिया मोरे श्वेता नाईक, ललिता पाटकर, श्रद्धा गुडेकर, गीतांजली कामत आदी उपस्थित होते. श्री. नेवरेकर यांनी सूत्रसंचालन केले.