|Friday, August 23, 2019
You are here: Home » leadingnews » मोदींची जवानांसोबत दिवाळी साजरी

मोदींची जवानांसोबत दिवाळी साजरी 

 

 

 

ऑनलाईन टीम / उत्तराखंड ः

दरवषीप्रमाणे या वषीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या जवानांसोबत उत्तराखंडमधील हषील येथे दिवाळी साजरी केली. जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर मोदींनी केदारनाथला जाऊन शिवशंकराचे दर्शनही घेतले.

2014पासून दरवषी मोदी हे सैन्यातील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. 2015 मध्ये त्यांनी सियाचिनला भेट दिली होती. यंदा त्यांनी उत्तराखंडमधील हषील येथे आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांना भेट दिली. या जवानांना मोदींनी गोडधोड खाऊ घातले. ’तुमच्यामुळे देशाचे नागरिक शांतपणे झोपू शकतात, अशी भावनाही मोदींनी यावेळी व्यक्त केली.

जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर मोदी केदारनाथला पोहोचले. केदारनाथच्या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेऊन त्यांनी जलाभिषेक केला. तसंच, मंदिराला प्रदक्षिणाही घातल्या. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी केदारनाथला दिलेली ही तिसरी भेट आहे. मे 2017 आणि जून 2018मध्येही मोदींनी केदारनाथचे दर्शन घेतले होते.