|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गोकुळच्या सभेची एसआयटीमार्फत चौकी करा

गोकुळच्या सभेची एसआयटीमार्फत चौकी करा 

प्रतिनिधी / कोल्हापूर

गाकुळ दूध संघाची नुकतीच झालेली सभा बेकायदेशीरपणे, हुकुमशहा पद्धतीने घेण्यात आलेली आहे. गैरकारभार, हाणामारीने सभा गाजली सहकाराला हे अजिबात भूषणावह नाही. चुकीच्या पद्धतीने सभा आटोपून संचालक मंडळाने सभासदांचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे  संचालक मंडळास पदावर राहणेचा अधिकारी नाही. सहकार कायद्याची पायमल्ली केल्याने संचालक मंडळ बरखास्त करुन सभेची एसआयटीमार्फत चौकशी करावी, स्वयंस्पष्ट अहवाल, आयुक्तांना सादर करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदन स्वीकारण्यास सहाय्यक निबंधक डॉ गजेंद्र देशमुख उपस्थित नसल्याने संतप्त आपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात देशमुख यांचा निषेध केला.

  कोल्हापूर जिल्हय़ामध्ये सहकारी कायदा धाक न राहिल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठय़ा सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांचाही सहकारावरील विश्वास उडत आहे. यास सहकार विभागतील अधिकारीच जबाबदार आहेत. गोकुळचीही वाटचाल त्याच दिशेने सुरु आहे. 30 सप्टेंबरला  पार पडलेली गोकुळची सभा बेकायदेशीररित्या पार पडण्यात आली. ही सभा रद्द बादल ठरवून महाराष्ट्र सहकार कायदा कलम 78 अन्वये संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करणेत यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे. दूध संघाच्या संपूर्ण कारभाराची मागील 10 वर्षांची तसेच दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या व करू न दिलेल्या प्रश्नांची महालेखापाल महाराष्ट्र राज्य व एसआयटी मार्फत चौकशी होऊन दोषी संचालक व संबंधितांवर कारवाई करणेत यावी.

 संस्थेचे प्रत्यक्ष सक्रीय संस्था प्रतिनिधी सुमारे 3659 व कर्मचारी अधिकारी संचालक सुमारे 4000 व्यक्ती सभेला हजर राहणार होते. परंतु 4000 सभासदांना बसण्यासाठी 16000 स्केअर फूट जागेची गरज असताना केवळ 1000 लोकांची बैठक व्यवस्था झाली. उर्वरीत सुमारे 2500 संस्था प्रतिनिधींना सकाळी पोलीस प्रशासनाने आणि संचालक मंडळाचे आदेशाने प्रवेशद्वार बंद केले होते. त्यामुळे 2500 संस्था प्रतिनिधी यांना जागे अभावी गेटच्या बाहेर रस्त्यावर उभे रहावे लागले.  प्रत्यक्ष सभेची वेळ सकाळी 11 वाजता असताना संचालक मंडळाने पहाटे 6 वाजलेपासून आपल्याला पोषक असलेल्या सभासदांना बसवले होते.  विषयपत्रिकेवरील 1 त 13 तसेच पोटनियम दुरूस्ती 1 ते 30 मुद्दे न वाचता न चर्चा करता सहकार कायद्याची पायमपल्ली करून 3 मिनिटांमध्ये राष्ट्रगीताचा आधार घेवून बेकायदेशीरपणे सभा गुंडाळण्यात आली. सदरची घटना सहकार कायदा, भारतीय राज्य घटना इत्यादी कायद्यांच्या विरोधात असून सहकाराला  दहशत फसरविणारी अशी आहे. त्यामुळे तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी निवेदनावर नारायण पोवार, जयंत पोवार, निलेश रेडेकर, प्रल्हाद बट्टेवार, इलाई शेख, आनंदा वजिरे, शरद पाटील, वाय. आर. निकम, उत्तम पाटील यांच्या सहय़ा आहेत.

Related posts: