|Monday, March 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मुसळधार पावसामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान

मुसळधार पावसामुळे स्ट्रॉबेरीचे नुकसान 

महाबळेश्वर

गहु गेरवा ते लिंगमळा दरम्यान वेण्णानदी तीरावर करण्यात आलेल्या विनापरवाना बांधकामामुळे नदी पात्रातील पाणी मंगळवारी स्ट्रॉबेरी पिकाच्या शेतात घुसल्याने या भागातील स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या दोन्ही बाजूला झालेल्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

  गेली तीन दिवस महाबळेश्वर येथे दुपारनंतर पाऊस कोसळत आहे. मात्र, मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे वेण्णानदीचे पात्र भरून पाणी वाहत होते. या नदी पात्राच्या दोन्ही बाजूला अनेक धनिकांनी बंगले व हॉटेलसाठी विनापरवाना बांधकामे केली आहेत. काही लोकांनी तर हे नदीपात्रातच अतिक्रमण करून बांधकाम केले आहे, त्यामुळे नदीपात्रातून वाहणाऱया पाण्यास अडथळा निर्माण झाला असून पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रातील पाणी थेट लगतच्या स्ट्रॉबेरी पिकाच्या शेतात घुसत आहे. लिंगमळा भागात नुकतीच स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यात आली होती.

Related posts: