|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भैरवनाथ कारखान्यावर शेतकऱयांकडून दिवाळीत ‘शिमगा’ -एफआरपीवरून ऊस आंदोलन पेटले

भैरवनाथ कारखान्यावर शेतकऱयांकडून दिवाळीत ‘शिमगा’ -एफआरपीवरून ऊस आंदोलन पेटले 

प्रतिनिधी /  उस्मानाबाद सोलापूर

 सोनारी ता. परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील भैरवाथ साखर कारखन्यावर बुधवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेले ऊस आंदोलन चांगले चिघळले. आंदोलन चिरडून टाकण्यासाठी ऊस वाहतुकीची ट्रक्टर तसेच ट्रकसारखी वहाने आंदोलक शेतकऱयांच्या अंगावर घालण्याचा वस्तुनिष्ठ प्रकार झाला. यावेळी कारखान्याचे संस्थापक आणि विधान परिषदेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांचे समर्थक आणि आंदोलक शेतकरी आमने – सामने आले. त्यांच्यामध्ये बराच वेळ धूमचक्री झाली. ऊस वाहतुकीची वहाने अंगावर घालण्याबरोबरच सावंत  समर्थक गुंडांनी केलेल्या मारहाणीत अनेक आंदोलक शेतकरी जायबंदी झाले.   सावंत  समर्थक गुंड आ†िण आंदोलक यांच्यामध्ये बराच वेळ मारझोड तसेच अंगावर वहाने घालण्याचा प्रकार खुद्द पोलीसांच्या समोर सुरु होता. तरीपण चिघळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण  न आणता पोलीसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा सनसनाटी आरोप स्वाभीमाने शेतकरी  संघटनेने केला. 

    दरम्यान थकीत एफआरपीवरून या कारखान्यावर बुधवारी दिवाळीत शिमगा साजरा झाला. ऊस गाडय़ा अडवून आंदोलन करणाऱया शेतकाऱयांनी पुढच्या काही वेळानंतर आंदोलनाचा नुर बदलला. पुढे दिवस भर कारखाना स्थळावर कारखाना प्रशासनाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन केले.मराठवाडा युवक स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष गोरख भोर  यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी जखमी झाले.

  ऊस उत्पादक शेतकऱयांचा मागील वर्षी जानेवारीनंतर गाळप झालेल्या ऊसाचा 400 रुपयांचा थकीत हप्ता त्वरीत द्यावा तसेच इतर मागण्यासाठी सोनारी येथील भैरवनाथ कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.6) सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको, अर्ध नग्नग्न आंदोलन तब्बल 6 तास करण्यात आले.

   याबाबत अधिक वृत्त असे की, परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ कारखान्याने मागील वर्षाच्या गाळपाचे पैसे शेतकऱयांना दिल्याची खोटी माहिती देऊन भैरवनाथ कारखान्याने गाळप परवाना घेतल्याचा आरोप करत त्याचा जाब विचारण्यासाठी आंदोलक कारखान्यावर आले होते.

  मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा 400 रुपयाचा थकीत हप्ता घेतल्याशिवाय उठणार नसल्याची ठाम भूमिका घेऊन अंदोलन आक्रमक होऊन कारखान्याच्या गेटवर धडकले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत निर्णय न घेतल्यास कारखान्यात घुसणार व गव्हाणीत उडय़ा मारणार असल्याचे जाहीर करून गेट समोर घोषणाबाजी करीत टाळ मृदंगाच्या वाद्यात भजन करण्यात आले.

   यावेळी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गोरख भोरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, तालुकाध्यक्ष शंकर घोगरे, शहर अध्यक्ष सादातअली काझी, रामेश्वर नेटके, भूम तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, शिवाजी ठवरे आदीस शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आदी मोठय़ा संख्येने अंदोलनात सहभागी झाले होते.

   स्वाभिमानी शेतकरी संघटना भैरवनाथ शुगरने मागील वर्षी गाळपातील 400 रुपये थकीत हप्ता द्यावा, यासाठी यापुर्वी तहसील समोर घंटानांद अंदोलन केले होते. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक रवींद्र शेलार यांनी दोन महिन्यात देऊ असे लेखी दिले होते. परंतु, 400 रुपये दिले नाहीत त्यानंतर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको अंदोलन करण्यात आले. याचीही दखल कारखान्याने घेतली नसल्यामुळे ऐन दिवाळी सणात कारखान्यावर आंदोलन केले. त्यामुळे कारखाना प्रशासन पूर्णपणे गोंधळून गेले होते.

Related posts: