|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फुटबॉल प्रेमीं लेस्टर डिसोझा मारहाण प्रकरणी न्याय मिळावा

फुटबॉल प्रेमीं लेस्टर डिसोझा मारहाण प्रकरणी न्याय मिळावा 

प्रतिनिधी/ मडगाव

फातोर्डा स्टेडियमवर फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी आलेल्या एफसी गोवाचा समर्थक लेस्टर डिसोझा याला पोलिसांकडून बेदम मारहाण होत असलेले व्हिडिओ व्हायरल झाल्याने, फुटबॉल प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लेस्टरला मारहाण करणाऱया पोलिसांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आत्ता सोशल मिडियावरून होऊ लागली आहे. या संदर्भात फातोर्डा पोलीस स्थानकावर रितसर तक्रार नोंद करण्यात आली असून या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू झाल्याची माहिती निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली आहे.

दि. 8 नोव्हेंबर रोजी फातोर्डा स्टेडियमवर लेस्टर डिसेझा (20) तसेच त्याचे वडिल सेबी डिसोझा व लेस्टर आई फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी आले होते. सामना संपल्यानंतर हे तिघेही मोबाईलवर सेल्फी काढण्यात गुंतले होते. त्यावेळी एका पोलिसाने त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी डिसोझा फॅमिली व पोलीस यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. हा सर्व प्रकार प्रेक्षक गॅलरीत घडला होता. नंतर या तिघांना पोलिसांनी मैदानावर खेचून गेले व लेस्टरला बेदम मारहाण करण्यात आली.

पोलिसांच्या मारहाणीत लेस्टरच्या तोंडाला जबर मार लागला. त्याच्या वडिलांना तसेच आईला देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. हे व्हिडिओ व्हायरल झाल्याने, सुरक्षा पुरविण्यात तैनात केलेल्या डय़ुटीवरील पोलिसांनी कायदा हातात घेतला. या प्रकारामुळे सद्या फुटबॉल प्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रेक्षक गॅलरीतून लेस्टर व त्याच्या पालकांना पोलिसांनी खेचत मैदानात का नेले. असा सवाल देखील उपस्थित झालेला आहे.

लेस्टर अद्याप इस्पितळात उपचार घेत असून त्याला न्याय मिळे पर्यंत फुटबॉल सामन्याचे आयोजन करू नये अशी मागणी फुटबॉल प्रेमींकडून होऊ लागली आहे. जर लेस्टर तसेच त्याचे पालकांचा काही गुन्हा होता तर त्यांना कायदेशीर अटक करणे आवश्यक होते. कायदा हातात घेऊन मारहाण करणे हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

फातोर्डा स्टेडियमवर झालेल्या मारहाण प्रकरणीत पालकांनी फातोर्डा पोलीस स्थानकावर उपनिरीक्षक दत्तप्रसाद तोरस्कर व उपनिरीक्षक रौनक कदम यांच्या विरोधात तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू झाल्याची माहिती निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली. लिस्टर डिसोझा वैद्यकीय अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. हा वैद्यकीय अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच कारवाई होईल अशी माहिती निरीक्षक देसाई यांनी दिली.

दरम्यान, या मारहाण प्रकरणात दोन उपनिरीक्षक गुंतल्याचे तक्रारीत म्हटल्याने, या उपनिरीक्षकांवर कारवाई करायची झाल्यास पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांना पोलीस खात्याची मान्यता घ्यावी लागणार आहे. ही मान्यता मिळाल्यास हे दोन उपनिरीक्षक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

Related posts: