|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » लाव्हाचा z81 दाखल

लाव्हाचा z81 दाखल 

 

पुणे / प्रतिनिधी :

 लाव्हा इंटरनॅशनलने अप्रतिम इमेज टिपण्यासाठी तयार केलेल्या स्टुडिओ मोड फोटोग्राफीचा समावेश असलेला z81 दाखल केला आहे.

  z81च्या 13 मेगापिक्सल रिअर कॅमेऱयामध्ये (फ्लॅशलह) नॅचरल, व्हायबंट, काँटूर व स्प्लॅश मोड यांचा समावेश आहे. नवा लाव्हा z81 दोन प्रकारांत मिळेल. याविषयी बोलताना लाव्हा इंटरनॅशनलचे अध्यक्ष सुनील रैना म्हणाले, प्रचंड आवाज व गर्दीच्या काळात सर्वांपासून आपले वेगळेपण दाखवणे गरजेचे आहे आणि आमचा z81 स्टुडिओ मोडद्वारे नेमके हेच करतो. आमच्या ग्राहकांना हे वैशिष्टय़ अतिशय उपयुक्त वाटेल व त्यांना आधुनिक स्मार्टफोन फोटोग्राफीचा अनुभव घेता येईल.