|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये मराठय़ांना नक्कीच मिळले ; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये मराठय़ांना नक्कीच मिळले ; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन 

पुणे / प्रतिनिधी :

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावर मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल सादर केला आहे. त्यादृष्टीने सरकारने ही आवश्यक ते सर्व कागदत्रांची जुळवणी करुन न्यायालयात टिकेल असे सक्षम पुरावे गोळा केलेले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनामध्येच मराठय़ांना नक्कीच आरक्षण मिळेल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी यावेळी दिली.

एका कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकारांशी ते बोलत होते. मुनगुंटीवार पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत समाजाच्या भावना ह्या तीव्र आहेत. त्यांचा आक्रोशही सर्व राज्याने पाहिलेला आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी दि. 15 नोव्हेंबर पर्यंत मागासवर्ग आयोग आपला अहवाल सादर करेल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्ती आयोगाने केली असून सरकारला आपला अहवाल सादर केलेला आहे. सरकारकडूनही आरक्षण न्यायालयात टिकेल यादृष्टीने आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव केलेली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण हे मतासाठी अथवा निवडणुकीसाठी म्हणून देणे योग्य ठरणार नाही. तर मराठा समाजातील शेवटच्या घटकाला आवश्यक असलेले अन्न, निवारा आणि वस्त्राची असलेली गरज पुर्ण करण्यासाठी दिले जात आहे. मराठा समाजाच्या उन्नतीचा मार्ग उपलब्ध होण्यासाठी हे मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार आग्रही आहे. त्याचबरोबर लोकसभेच्या आचारसंहितेची ही अडचण निर्णय घेताना येणार नाही. कारण पुढील आठवडय़ात सुरु होणाऱया हिवाळी अधिवेशनातच मराठा समाजाला आरक्षण मिळून जाईल, असे आश्वासनही मुनगुंटीवार यांनी यावेळी दिले.

अवनी या वाघिणीच्या मृत्युबद्दल ट्विटरवर अथवा इतरांना पत्र व्यवहार करुन उपयोग नाही. त्यापेक्षा त्या केंद्रिय मंत्र्यांनी थेट मलाच विचारावे, म्हणजे मला उत्तर देणे सोपे जाईल, अशा शब्दात वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी मेनका गांधी यांना प्रतिउत्तर दिले आहे.

अवनी वाघिणीच्या मृत्युबाबत सध्या राज्यात आणि केंद्र पातळीवर वातावरण तापले असून वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरावरतुन होत आहे. याबाबत केंद्रिय महिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून वन खात्याच्या मंत्रीपदावरुन सुधीर मुनगुंटीवार यांची हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. याबाबत विचारले असताना मुनगुंटीवार म्हणाले की, संबंधित केंद्रिय मंत्र्यांचे मला पत्र आलेले नाही अथवा त्यांनी त्याबाबत कोणतीच चर्चा माझ्याशी केलेली नाही. ज्यांना पत्र पाठविले आहे, ते त्या पत्राला नक्कीच उत्तर देतील. तसेच टिव्टरच्या माध्यमातून बोलण्यापेक्षा त्यांनी थेट मलाच विचारावे. म्हणजे मला सविस्तर माहिती देता येऊ शकेल. वर्षभरात अनेक हजारो प्राण्यांचा मृत्यू होत असतोच. त्या ठिकाणी 8-8 फुटाचे वाढलेले गवत असल्यामुळे अवनी वाघिणीला जेरबंद करण्यात अडचणी येत होत्या. तिच्या तीन बछड्यांचाही शोध मोहिम सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकाला माहितीचा अधिकार हा कायदा लागू झालेला आहे. त्या तर केंद्रिय मंत्री आहेत त्यांना कोणतीही माहिती पटकन मिळू शकते. त्यांनी माहिती घेऊन थेट माझ्याशी बोलणे गरजेचे होते, असेही मुनगुंटीवार यांनी यावेळी सांगितले.