|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » शाहीर अनंत फंदेंच्या जन्मशताब्दीचा शासनाला विसर: प्रा. शिरीष गंधे

शाहीर अनंत फंदेंच्या जन्मशताब्दीचा शासनाला विसर: प्रा. शिरीष गंधे 

पुणे / प्रतिनिधी :

प्रतिभासंपन्न शाहीर अनंत फंदी यांच्या जन्मशताब्दीचा राज्य शासनाला विसर पडला असल्याची खंत अभ्यासक प्रा. शिरीष गंधे यांनी व्यक्त केली.

जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभरात फंदे यांच्यावरील 200 कार्यक्रम करण्याचा निर्धार प्रा. गंधे यांनी केला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ पुण्यात प्रभा अत्रे गुरूकुलमध्ये गुरूवारी झाला.

संगमनेर येथील जन्म असलेले शाहीर अनंत फंदे यांचे पुण्याशी अतूट नाते होते. त्यांनी विविध काव्यप्रकार हाताळले. तमाशा व कीर्तन अशा दोन्ही प्रकारांत त्यांनी आपले प्रभुत्त्व सिद्ध केले होते. ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको’ अशा अगदी सोप्या भाषेत त्यांनी काव्य मांडले. शाहिरांची कविता धीट होती आणि त्यांच्यात धैर्य होते, असे मत प्रा. गंधे यांनी मांडले. अनंत फंदी हे मराठी शारदेला पडलेले सुंदर स्वप्न होते. त्यांची ओळख महाराष्ट्राला कायम रहावी म्हणून प्रा. शिरीष गंधे यांनी वर्षभरात त्यांच्यावरील 200 कार्यक्रम करण्याचा चंग बांधला आहे. कोणत्या संस्थेला कार्यक्रम करायचा असल्यास प्रा. गंधे (9766202141) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.