|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » अन्नपूर्णा परिवाराचा बालदिन उत्साहात साजरा

अन्नपूर्णा परिवाराचा बालदिन उत्साहात साजरा 

ऑनलाईन टीम / पुणे :

अन्नपूर्णा परिवाराच्या वास्तल्यापूर्ण उपक्रमा अंतर्गत पुण्याच्या वस्तीतील लहान मुलां-मुलीं बरोबर बालदिन साजरा करण्यात आला. यामध्ये एकूण 600 मुलांचा समावेश होता. झोपडपट्टीतील मुलांचे जीवन सुधारावे व बाल हक्कांबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवषी अन्नपूर्णा परिवार बालदिन साजरा करतात.

 

अन्नपूर्णा परिवाराचा बालदिन उत्साहात साजरा

अन्नपूर्णा परिवार मागील तीन दशकांपासून झोपडपट्टीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. अन्नपूर्णाच्या वास्तल्यापूर्ण या योजनेत बाल हक्क व महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला जातो. बालदिनानिम्मति मुलांना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी गायन व नाच करून आनंद घेण्यासाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अन्नपूर्णाच्या अनेक योजनां मधुन बाल हक्क व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले जाते. मागील 15 वर्षात पुण्यातील 14 वस्तीमध्ये 16 केअर सेंटर तर मुंबई मध्ये 4 केअर सेंटर उभारून अनेक महिलांना स्वयंरोजगारासाठी अन्नपूर्णा परिवार मदत करत आले आहे.

या वेळी अन्नपूर्णा परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. मेधा पुरव-सामंत म्हणाल्या, ‘वस्तीतील लहान मुलांकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. गरिबीमुळे मुलांच्या बालपणावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांचा जगण्याकडे व विकासाकडे कायम लक्ष देणे आवश्यक असते. त्यासाठीच अशा प्रकारचे विविध उपक्रम लहान मुलांसाठी सातत्याने करणे गरजेचे आहे.’