|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 51 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

51 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी 

वार्ताहर/   येडूर

गुरुवारी नणदी येथील 15 एकरातील उसाला आग लागल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा चंदूरटेक (ता. चिकोडी) येथील गाव वसतीला लागून असलेल्या उसाच्या फडांना आग लागल्याची घटना घडली. उसाला आग लागून सुमारे 51 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेत जवळपास 60 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये 27 शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचा रुद्रावतार पाहता जवळपास एक किलोमीटरपर्यंत परिसरात धुराचे लोळ पहावयास मिळाले. चिकोडी व रायबाग येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग अटोक्यात आणली.

घटनेविषयी अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास चंदूरटेक येथील लोकवसतीच्या पूर्वेस भागवत पाटील व संजय पाटील यांच्या सर्व्हे नंबर 102 गट क्रमांकातील प्रत्येकी एका एकरातील उसाला आग लागली.  वाऱयामुळे आगीने क्षणातच रुद्रावतार धारण केला. परिसरात केवळ धुराचे लोळ पसरले होते. सायंकाळी सातपर्यंत सर्व्हे नंबर 102 ते 108 पर्यंतच्या उसाला मोठय़ा प्रमाणात आग लागली होती.

यामध्ये गणपती पाटील, भास्कर पाटील, प्रकाश पाटील, जयकुमार बेडगे, जयपाल खुरपे यांच्या प्रत्येकी एक एकर, रावसाहेब पाटील, कोंडिबा पाटील, रवी पाटील, पांडुरंग पाटील यांच्या प्रत्येकी दीड एकर, प्रवीण पाटील, विजय पाटील, शामराव पाटील, आप्पा खुरपे यांच्या प्रत्येकी दोन एकर, आण्णासाहेब मंगसुळे यांच्या दोन एकर, देवगोंडा पाटील यांच्या दहा एकर, रायगोंडा पाटील यांच्या चार एकर, अनिल पाटील, कल्लू पाटील, प्रकाश पाटील, बाळू पाटील, पांडू पाटील, आप्रुर पाटील यांच्या एकूण सहा एकर, अभिजित पाटील, विठ्ठल पाटील, जयसिंग पाटील, विष्णू हरि पाटील, विष्णू भाऊ पाटील यांच्या एकूण 10 एकर क्षेत्रातील असा 27 शेतकऱयांचा 51 एकरातील ऊस आगीत खाक झाला आहे.

स्थानिकांनी व शेतकऱयांनी शेती पंपाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण वाऱयामुळे आग वाढतच गेल्याने चिकोडी येथील दूधगंगा-कृष्णा साखर कारखाना व रायबाग नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. आगीची घटना कळताच दूधगंगा-कृष्णा साखर कारखाना, दत्त कारखाना शिरोळ, शिवशक्ती कारखाना यड्राव, गुरुदत्त कारखाना टाकळीवाडीच्या शेती खात्याच्या अधिकाऱयांनी पाहणी करुन ऊस तोडणी सुरू केली. यावेळी चंदूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन शेतकऱयांना धीर दिला.

शेतकऱयातून संताप

चंदूरटेक येथे उसाला आग लागून 51 एकरातील ऊस जळाला. ही घटना चिकोडी तालुक्यातील सर्वात मोठी घटना आहे. पण या ठिकाणी शासकीय पातळीवरील कोणत्याही अधिकाऱयाने भेट दिली नसल्याने शेतकऱयातून संताप व्यक्त होत आहे.

Related posts: