|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्गात आंतरराष्ट्रीय दर्जाची युनिव्हर्सिटी!

दोडामार्गात आंतरराष्ट्रीय दर्जाची युनिव्हर्सिटी! 

दीपक केसरकर यांची माहिती : आंबेली नाटय़महोत्सवाचे उद्घाटन : केरळच्या धर्तीवर तिलारी पर्यटन केंद्राचा विकास

प्रतिनिधी / दोडामार्ग:

केरळमध्ये पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे. हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. याच धर्तीवर तिलारीतही पर्यटन बनविण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहे. शिवाय दोडामार्ग तालुक्यात दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची युनिव्हर्सिटी उभी राहील. येत्या महिनाभरात आपण या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टीची घोषणा करणार आहे. गोव्यात येणारे पर्यटक आता तिलारीत येतील. इथल्या लोकांचं राहणीमान उंचावेल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा गृहराज्य व वित्तमंत्री दीपक केसरकर यांनी करीत मी काम करणारा आमदार आहे. कोण टीका करतो, त्याला अशाप्रकारे कामातून प्रत्युत्तर देतो, असा टोलाही विरोधकांना लगावला.

उद्योजक कृष्णा पालयेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाटय़महोत्सवाच्या आयोजनप्रसंगी केसरकर बोलत होते. येथील कै. अनिता कृष्णा पालयेकर सांस्कृतिक कलामंचावर हा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांच्यासमवेत उद्योजक कृष्णा पालयेकर, उपसभापती सौ. धनश्री गवस, पं. स. सदस्य बाबूराव धुरी, अखिल भारतीय भंडारी समाज अध्यक्ष नवीनचंद्र बांदीवडेकर, जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, माजी पोलीस पाटील लक्ष्मण गुळळेकर, सरपंच सौ. स्नेहा गवस, उपसरपंच सौ. शांती पालयेकर, ऍड. सोनू गवस, चंदू मळीक, दादा पालयेकर, गोविंद महाले, फटी कोरगावकर, डॉ. ऐवळे, गणेशप्रसाद गवस आदी उपस्थित होते.

केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नाटय़महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी केसरकर यांनी, पालयेकर कुटुंबियांचे कौतुक केले. दोडामार्गातही व्यावसायिक नाटय़प्रयोग व्हावेत, ही त्यांची संकल्पना सांस्कृतिक चळवळ वाढवणारी असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या.

आता गोव्याकडे वारंवार विनंती नाही!

सध्या गोवा – सिंधुदुर्ग यांच्यात आरोग्य व रोजगार यावरुन सुरू असलेले वाद व कराव्या लागणाऱया विनंत्या यापुढे बंद होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आरोग्याच्यादृष्टीने दोडामार्गातील ग्रामीण रुग्णालयात 20 खाटाहून अधिक असतील. दर्जेदार रस्ता होण्यासाठी 110 कोटी मंजूर, तिलारीत पर्यटन केंद्रासाठी पाच कोटी शिवाय तिलारीत केरळच्या धर्तीवर पेरियार सारखे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ होईल. येथे पर्यटकांचा ओघ वाढेल व रोजगार उपलब्ध होतील. तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक युनिर्व्हसिटी उभी राहील. त्यासाठी जागा निश्चितीचे काम सुरू असल्याचेही सांगितले. सूत्रसंचालन प्रा. संजय खडपकर, प्रशांत निबांळकर यांनी तर आभार प्रकाश आर्लेकर यांनी मानले.

पालयेकर यांचे कौतुक

दोडामार्गातील उद्योजक पालयेकर यांनी नाटय़महोत्सव आयोजन करून जनतेला दिलेल्या करमणुकीच्या आनंदाचे केसरकर यांनी कौतुक केले. यावेळी बांदिवडेकर, धुरी, बंगे, सौ. गवस, ऍड. गवस आदींनी मनोगत व्यक्त केले.

Related posts: