|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कांदा दर घसरल्याने पुन्हा गेट बंद आंदोलन

कांदा दर घसरल्याने पुन्हा गेट बंद आंदोलन 

प्रतिनिधी/ बेळगाव

कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव येथे शनिवारी कांदा दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱयांनी दुपारी 2 वाजता गेटबंद आंदोलन केले. शनिवारी कांदा लिलावाला सुरुवात होताच मागील बाजारापेक्षा प्रतिक्विंटल 500 रुपयांनी दर कमी होऊन कांद्याचा भाव कमी झाल्यामुळे संतप्त शेतकऱयांनी लिलाव थांबविला व आंदोलन छेडले. त्यामुळे कांदा सवाल बंद झाला. उत्पादक शेतकऱयांनी योग्य भाव मिळावा, यासाठी अडीच तास कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशबंद करून आंदोलन छेडले. परिणामी मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारापासून कंग्राळी खुर्द, नेहरुनगर, वेंगुर्ला रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या महिनाभरातील कांदा उत्पादक शेतकऱयांचे हे दुसरे आंदोलन असून त्यांनी कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे सर्वत्र वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. होती. याची दखल घेत लागलीच एपीएमसी पोलीस स्थानकाचे सीपीआय कालीमिर्ची व बी. आर. गड्डेकर मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी घटनास्थळी पोलीस फौजफाटय़ासह धाव घेतली. याप्रसंगी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱयांना समजावून सांगत म्हणाले की, आंदोलक शेतकऱयांनी असे ठिय्या आंदोलन न करता यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱयांनी समन्वय साधत होते. मात्र शेतकऱयांचा रोष अधिक असल्याने आपल्या मागण्यांवरती ठाम राहिले. त्यानंतर तब्बल अडीच तासांनी शेतकऱयांना समजावत बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची कमिटी शेतकरी व मार्केटचे एसपी एन. बी. बरमनी यांच्यात एक बैठक झाली. शनिवारी जमखंडी, भागासहित लोकापूर, मुधोळ, मुद्दापूर, हेब्बाळ, कोंडसकोप, करीकट्टी, आसुंडी, लक्ष्यानट्टी, सिप्पूर, वरचगल आदी भागातून 350 रुपये ट्रक कांदा आवक होती. या संपूर्ण कांदा उत्पादनाला चांगला हमीभाव देण्याचे व हुबळी, बेंगळूर, बाजारपेठेत जो भाव आहे तोच मिळवून देण्याची हमी दिली. कांद्याचा भाव 200 ते 1300 पर्यंत देण्याची हमी दिली. कांद्याचा भाव स्थिरावला. पुन्हा लिलावाला सुरुवात झाली. त्यानंतर गेटबंद आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, महेश कुगजी, मनोज मत्तीकोप्प, सचिव गुरुप्रसाद, व्यापारी संभाजी होनगेकर, दीपक पाटील, हुवाप्पा मुतगेकर, अशोक पवार, टी. एस. पाटील, संदीप मुंगारी, विश्वास टुमरी, राजू पाटील, मधू संभाजी, परशराम चौगुले आदी बैठकीला उपस्थित होते.

Related posts: