|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » मित्र महोत्सवाचे येत्या शनिवारी व रविवारी आयोजन

मित्र महोत्सवाचे येत्या शनिवारी व रविवारी आयोजन 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यातील मित्र फाउंडेशच्या वतीने येत्या शनिवार 14 नोव्हेंबर व रविवार 25 नोव्हेंबर रोजी मित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्वेनगर डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे दोन्ही दिवस सायंकाळी 5.30 वाजल्यापासून हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाला 100 रुपये इतके दोन्ही दिवसांसाठीचे तिकीट आहे.

सदर कार्यक्रमाची अधिक माहिती देताना मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गोखले म्हणाले की, दरवषी प्रमाणे याहीवषी आपण फाउंडेशनच्या माध्यमातून दर्जेदार शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी घेऊन आलो आहोत. यावषीचा मित्र महोत्सव हा दोन दिवसाचा असून शास्त्रीय संगीताबरोबरच व्हायोलीन, सरोद या वाद्यांचा आनंदही रसिकांना घेता येणार आहे. महोत्सवाची सुरुवात शनिवार 24 नोव्हेंबर, 2018 रोजी किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होणार आहे. यावेळी सुरोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला) हे त्यांना साथसंगत करतील. यानंतर एन. राजम यांचे व्हायोलिन वादन होणार आहे. एन. राजम यांना नंदिनी शंकर (व्हायोलिन) तर सौरभ कर्डीकर (तबला) अशी साथसंगत असेल. यानंतर रविवार 25 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध सरोदवादक अमजद अली खॉ यांचे सुपुत्र आणि सेनई बंगश घराण्याच्या सातव्या पिढीतील सरोदवादक अयान अली बंगश यांचे सरोदवादन होईल. त्यांना सत्यजित तळवलकर हे तबल्यावर साथसंगत करतील. महोत्सवाचा समारोप पतियाळा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुमधुर गायानाने होणार आहे. त्यांना तन्मय देवचक्के (संवादिनी) तर सत्यजित तळवलकर (तबला) अशी साथसंगत असेल. बरोबरच फाउंडेशनच्या वतीने 2005 सालापासून वयोवृद्ध गुरुजनांना गौरव निधी दिला जातो. यावषी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कुसुमताई सोहनी यांना महोत्सावाच्या पहिल्या दिवशी एन. राजम यांच्या हस्ते हा गौरव निधी प्रदान करण्यात येईल. आता पर्यंत तब्बल 55 जणांना हा गौरव निधी देण्यात आला असून रुपये 11 हजार असे याचे स्वरूप आहे. महोत्सवासाठी रुपये 100 इतके सिझन तिकीट ठेवण्यात आले असून सोमवार 19 नोव्हेंबर पासून पंडित फार्म, नावडीकर म्युझिकल्स, कोथरूड, शिरीष टेडर्स, कमला नेहरू पार्क या ठिकाणी ती उपलब्ध होऊ शकणार आहेत.

Related posts: