|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात पावसाची हजेरी

कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात पावसाची हजेरी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिह्यातील अनेक तालुक्मयांमध्ये पावसाने जोरदार सरी बरसल्या आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस झाल्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर जिह्यातल्या शिरोळ तालुक्मयात, सांगलीच्या खानापूर, आटपाडीत पावसाने हजेरी लावली. तर सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ, मालवण या भागातही पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला आहे. भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱया सांगलीतील पूर्वेकडील खानापूर, आटपाडी, कडेगाव पलूस या तालुक्मयांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर कवठे महाकाळ तालुक्मयात संततधार सुरू आहे. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे काही भागातील ऊस तोडी देखील थांबल्या आहेत. पुढचे 48 तास मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच सद्यस्थितीत मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना त्वरित नजीकच्या बंदरात येण्याच्या सूचना हवामान व मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

Related posts: