|Friday, May 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » छत्तीसगडमध्ये आज मतदान

छत्तीसगडमध्ये आज मतदान 

दुसऱया टप्प्यात 72 मतदारसंघात 1,079 उमेदवार

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगड विधानसभेच्या दुसऱया टप्प्यासाठीचे मतदान मंगळवारी होणार आहे. 19 जिल्हय़ांमधील 72 मतदारसंघांतील नागरिक आपला हक्क बजावतील. प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून, सुमारे एक लाख पोलीस कर्मचारी तैनात आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त 8 जिल्हय़ांमधील 18 मतदारसंघात 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. यावेळी नागरिकांनी नक्षलींची दहशत झुगारल्याने  सरासरी 70 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

 दुसऱया टप्प्यात विधानसभा अध्यक्ष, नऊ मंत्र्यांसह सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. 72 मतदारसंघात एकुण 1,079 उमेदवार रिंगणात आहेत. एक कोटी, 53 लाख 85 हजार 983 मतदार असून, यातील पुरूष मतदार 77,46,628 तर 76,38,415 महिला आहेत.940 इतर मतदार आहेत. 19,296 मतदान केंद्रांवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून नक्षलप्रभावी जिल्हय़ात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  भाजपने सलग चौथ्यावेळी सत्ता हस्तगत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर 15 वर्षांचा राजकीय वनवास संपविण्यासाठी काँग्रेसनेही सर्व शक्ती पणाला लावली असून, 11 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Related posts: