|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मराठी चित्रपटावर सातारकरांच्या उडय़ा

मराठी चित्रपटावर सातारकरांच्या उडय़ा 

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयात ऐन दिवाळीच्या सुट्टीत राजलक्ष्मी चित्रपटगृहात लागलेला बिगबॅनर हिंदी चित्रपट ‘”ग्स ऑफ हिंदोस्तान’कडे सातारकरांनी पाठ फिरवली असून दुसऱयाच आठवडय़ात प्रदर्शत झालेला नागराज मंजुळेंचा नाळ व सुबोध भावे यांचा डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटांवर सातारकर रसिकांनी उडय़ा मारल्या आहेत. या मराठी चित्रपटावर सातारकर रसिकांनी उडय़ा मारल्या असून दररोज या चित्रपटाचे खेळ हाऊसफुल्ल होवू लागले आहेत.

 काही वर्षांच्या पूर्वी साताऱयात चित्रपट पाहण्यासाठी सात चित्रपटगृहे उपलब्ध होती. त्यामुळे चित्रपट रसिकांना चॉईस उपलब्ध होत होता. परंतु काळाच्या ओघात राधिका, समर्थ, चित्रा, जयविजय, प्रभात व कृष्णा ही चित्रपटगृहे काही कारणास्तव बंद पडली. या सर्व चित्रपटगृहे बंद पडण्यामागे विविध कारणे होती. या सर्वांमध्ये राजलक्ष्मी चित्रपटगृह वातानुकुलीत बनून अद्याप सातारकरांच्या सेवेत उभे आहे. आता सातारकरांनी करमणुकीसाठी फक्त अन् फक्त राजलक्ष्मी या चित्रपटगृहावर सध्या प्रक्षेकांना अवलंबून रहावे लागते. तसेच नाटकही तशी फारशी साताऱयात येत नाही. त्यामुळे इंटरनेटच्या व टीव्ही चॅनलच्या जमान्यात चित्रपटगृहे ओस पडत चालली असताना नागराज मंजुळेच्या नाळ व सुबोध भावेंच्या डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाने सातारकर रसिकांवर मोहिनी घातली असून हे दोन्ही चित्रपट  पाहिण्यासाठी राजलक्ष्मी चित्रपटगृह हाऊसफुल्ल होताना दिसत आहे.

 एक काळ मराठी चित्रपट म्हणजे फालतु आणि हिंदी म्हणजे गेट म्हणणारीच आता माय-बाप प्रेक्षक मराठीच लय भारी म्हणताना दिसत आहेत. सातारा शहराप्रमाणेच मोठया शहरातही पुणे, सांगली, कोल्हापुर या भागातही या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड लावण्यास सुरूवात केली आहे. साताऱयातील एकमेव असलेले राजलक्ष्मी चित्रपटगृह सुध्दा कधी-कधी ओस पडत असल्याचे दिसून येते. परंतु चित्रपटात दम असेल तर माय-बाप प्रेक्षक गर्दी केल्याशिवाय राहत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

सेव्हन स्टारचे ओपनिंग नाळने व्हायला पोहीजे होते

साताऱयात आता सेव्हन स्टार चित्रपटगृह लवकरच सुरू होत आहे. आता या वातानुकुलीत व मल्टीफलेक्स चित्रपटगृहाचे ओपनिंगही चांगल्याच चित्रपटाने व्हावे अशी सातारकर रसिकांची इच्छा होती. या चित्रपटाचे कौतुक चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षकांनीही भरभरून केले आहे. त्यामुळे या चित्रपटाने सेव्हन स्टारचे ओपनिंग झाले असते तर नाळ हा सातरकरांचा दीर्घकाळ लक्षात राहिला असता व विशेष म्हणजे मराठी चित्रपटाने ओपनिंग झाले असते तर …. हा दुग्धशर्करा योग काही जुळून न आल्याने अनेक सातारकरांनी नाराजी व्यक्त केली.