|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहिदांच्या हौतात्म्याचा विसर पडू देऊ नका : प्रेरणा कट्टे

शहिदांच्या हौतात्म्याचा विसर पडू देऊ नका : प्रेरणा कट्टे 

वार्ताहर /पुसेगाव :

नागरिकांच्या सेवेसाठी, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा रात्रंदिवस राबत असते. यावेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. 26/11 च्या हल्यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी दाखवलेले शौर्य व केलेली अतुलनीय कामगिरी पोलीस खात्यालाच नव्हे, तर संपूर्ण जनतेला अभिमानास्पद आहे. या शहिदांच्या बलिदानातून युवकांना स्फूर्ती व ऊर्जा  मिळत असल्याने त्यांच्या हौतात्म्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी केले.

पुसेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार जयश्री आव्हाड, शहाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आदींसह विविध गावांचे पोलीसपाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.