|Monday, February 18, 2019
You are here: Home » Top News » कोळसा घोटाळा ; माजी सचिव एच सी गुप्तांसह पाच दोषी

कोळसा घोटाळा ; माजी सचिव एच सी गुप्तांसह पाच दोषी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोळसा घोटाळय़ा प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले आहे. कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्तांसह विकास मेटल पॉवर लिमिटेड या कंपनीच्या चार जणांचा यात समावेश आहे. पश्चिम बंगालमधील मोयरा आणि मधुजोरमधील कोळसा खाणवाटपप्रकरणातील घोटाळय़ासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

 

यूपीए सरकारच्या काळात मोयरा आणि मधुजोरमधील कोळसा खाणवाटपात घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयात सुनावणी सुरु होती. शुक्रवारी कोर्टाने या प्रकरणात निकाल दिला आहे. कोर्टाने कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्तांसह चार जणांना दोषी ठरवले आहे. यात विकास मेटल प्रायव्हेट लिमिटेड चार अधिकाऱयांचाही समावेश आहे.

 

Related posts: