|Saturday, May 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दहशतवादाला अब्दुल लोणच जबाबदार

दहशतवादाला अब्दुल लोणच जबाबदार 

फारुख अब्दुल्लांचा आरोप : शस्त्रास्त्र आणण्यासाठी पाकला गेल्याचा दावा

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पीपल्स कॉन्फरन्स पार्टीचे नेते सज्जाद लोण यांना घराणेशाही राजकारणाचे पाईक ठरविले आहे. सज्जाद यांचे वडिल अब्दुल गनी लोण यांनी काश्मीर खोऱयात दहशतवाद आणल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला आहे. सज्जाद यांनी अलिकडेच जम्मू-काश्मीरमधील घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध करत आपला पक्ष याच्या विरोधात असल्याचे म्हटले हेते.

1984 च्या एका घटनेचा उल्लेख करत फारुख यांनी गंभीर आरोप केला आहे. 1984 मध्ये राज्यपाल जगमोहन यांनी माझे सरकार बरखास्त केले होते, तेव्हा अब्दुल गनी लोण यांनी आपण बंदूक आणण्यासाठी पाकिस्तानला जात असल्याचे सांगितले होते. काश्मीरमध्ये बंदूक आणू नका, बंदुकीमुळे आमच्या माता आणि भगिनींची सुरक्षा धोक्यात येईल, तरुण मारले जातील आणि गाव-शहरे उद्ध्वस्त होतील अशी त्यांच्यासमोर हात जोडून विनवणी केली होती. परंतु अब्दुल लोण यांनी बंदूक आणलीच. पाकिस्तानातून परतल्यावर त्यांनी माझी माफी मागत काश्मीरमध्ये बंदूक आणून घोडचूक केल्याचे म्हटले होते असा दावा फारुख यांनी केला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान निर्माण होणारा कर्तारपूर कॉरिडॉर दोन्ही देशांच्या संबंधांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पाकव्याप्त काश्मीर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर देखील काही नवे मार्ग खुले केले जावेत. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे दोन्ही देशांचे लोक जवळ येतील आणि परस्परांना वेगळे समजणार नाहीत असे विधान फारुख यांनी केले आहे.

Related posts: