|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गोहत्येच्या संशयावरून बुलंदशहरात आगडोंब

गोहत्येच्या संशयावरून बुलंदशहरात आगडोंब 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, बुलंदशहर,

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात गोहत्येच्या संशयावरून सोमवारी आगडोंब उसळला. जमावाच्या दगडफेकती पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात युवक ठार झाला. जमावाने पोलीस ठाण्यासह शेकडो वाहने पेटवली.हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बरेलीसह परिसरातील गावांमध्ये हायअलर्ट जारी केला आहे.याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोहत्येच्या संशयावरून बुलंदशहरातील चिंगरावठी परिसरातील चौकात सोमवारी सकाळी जमाव जमला. रास्तारोको केले. पोलिसांनी  अटकाव केल्यानंतर बेकाबू जमावाने तुफान दगडफेक केली. चिंगरावठी पोलीस ठाण्याबरोबरच शेकडो वाहने पेटवली. दगडफेकीत पोलीस निरीक्षक सुबोध कुमारसिंह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आहे. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये मित्राला दुचाकीवरून सोडण्यास निघालेला तरूण ठार झाला. शहरातील तणाव कायम असून शीघ्र कृती दलाचे पाच पथक तैनात केली आहेत.

पोलीस निरीक्षक सुबोध कुमारसिंह यांना समाजकंटकाने गोळी झाडली असावी, असा संशयही व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पोलिसांवरील हल्ल्याचे मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण झाले आहे. त्यानुसार तपास सुरू आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.