|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » leadingnews » साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर म.सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ कादंबरीची निवड

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर म.सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ कादंबरीची निवड 

पुणे / प्रतिनिधी :

ज्येष्ठ  समीक्षक म. सु. पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. म.सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवीत्वशोध’ या समीक्षाग्रंथाला हा पुरस्कार दिला जाणार आहे. कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत यांची निवड करण्यात आली. 2018 साठीच्या ‘भाषा सन्मान’ पुरस्कारासाठी मराठी लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे. साहित्य अकादमीने बुधवारी 24 भाषांमधील पुरस्कार जाहीर केले.

येत्या 29 जानेवारी ला दिल्लीमध्ये अकादमीतर्फे आयोजित होणाऱया वार्षिक ‘शब्द महोत्सवा’त हे पुरस्कार प्रदान केले जातील. एक लाख रुपयांचा चेक, ताम्रपट आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सात कवितासंग्रह, सहा कादंबऱया, सहा लघुकथा, तीन साहित्य समीक्षा आणि दोन निबंधांची निवड साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली. अभिजात वाङ्?मय आणि संशोधनपर लिखाणासाठी देण्यात येणाऱया प्रतिष्ठेच्या  भाषा सन्मान पुरस्कारासाठी (2018) पुण्याच्या डॉ. शैलजा बापट यांची निवड करण्यात आली आहे. ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडातील संशोधनपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. तसेच, शुद्ध अद्वैत आणि ‘केवल अद्वैत’ वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्स म्हणून निवड करण्यात आली होती. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या त्या सदस्य आहेत. एक लाख रुपये, ताम्रपट आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

साहित्य अकादमीतर्फे जाहीर केल्या जाणाऱया वार्षिक पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. देशातील सर्व भाषांमधील उत्कृष्ट वाङ्मयीन कलाकृतींची यामध्ये निवड केली जाते. यामध्ये मराठी भाषेसाठी म. सु. पाटील लिखित ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध (वाङ्मयीन समीक्षा)’ ग्रंथाची निवड करण्यात आली आहे, तर कोकणी भाषेतील कवी परेश नरेंद्र कामत लिखित ‘चित्रलिपी’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. उर्दू साहित्यासाठी कादंबरीकार रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कादंबरीला गौरविण्यात आले आहे. 24 भाषांमधील विविध कलाकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Related posts: