|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पोलिस निरिक्षकांची बढती करावी

पोलिस निरिक्षकांची बढती करावी 

प्रतिनिधी/ पणजी

 मागिल सुमारे आठ वर्षात 18 पोलिस निरिक्षक बढतीच्या प्रतिक्षेत असून सरकार नविन उपअधिक्षकांची थेट भरती करत आहे. हा या पोलिस निरिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने डिसेंबर महिन्याचा आत त्यांची बढती केली नाही तर कॉंगेसपक्षातर्फे आम्ही थेट न्यायालयात जाणार असल्याचे यावेळी कांगेसचे प्रवक्ता उर्फान मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 जर पोलिसांकडून एखादी चुक झाली तर सरकार त्यांच्यावर लगेच कारवाई करते. पण हे पोलिस निरिक्षक स्वःताच्या हक्काच्या बढतीसाठी अनेक वर्षे वाट पाहत आहे. त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही. या अगोदरही हा विषय आम्ही सरकार समोर मांडला होता पण सरकारने याकडे दुलर्क्ष केले. आता डिसेंबर पर्यंत त्याची भढती झाली नाहीतर आम्ही थेट न्यायालयात आव्हान करणार, असे ऊर्फान मुल्ला म्हणाले.

आरोग्य मंत्री फक्त आश्वासने देतात

 आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे फक्त आश्वासने देत आहेत. नुकतेच बांबोळी येथे दोन मुलांचा कर्करोगाने मृत्यू झाल आहे. आरोग्यमंत्री गेले सहा महिने बांबोळी येथे कर्करोग युनिट स्थापन करणार अशी घोषणा करत आहेत पण अजून काहीच झाले नाही. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे असे यावेळी ऊर्फान मुल्ला म्हणाले.

Related posts: