|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मंत्री रोहन खवटे परुळेकरांना संरक्षण देतात

मंत्री रोहन खवटे परुळेकरांना संरक्षण देतात 

प्रतिनिधी/ पणजी

 महुसल मंत्री रोहन खवटे हे कोमुनिदाद जमीन घोटाळा प्रकरणात माजी मंत्री दिलीप परुळेकर यांना संरक्षण देत आहेत. न्यायालयाचा आदेश असतानाही त्यांची चौकशी केली जात नाही. एक प्रकारे न्यायालयचा अवमान महसुल मंत्री करत असल्याचा आरोप ‘लोकांचो आधार’ या संघटनेचे आध्यक्ष ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

 सेरुला प्ररकण घडले त्यावेळी रोहन खवटे हे विरोधात होते. त्यावेळी ते परुळेकराविरोधात आवाज उठवित होते. आता युती सरकारमध्ये असल्याने ते पुरुळेकराविरोधात आवाज उठवत नाही. परुळेकरावर आवाज उठविला तर भाजप त्यांची सर्व प्रकरणे बाहेर काढणार ही भिती त्यांना आहे. त्यामुळे न्यायालयाने आदेश देऊनही त्याकडे दुलर्क्ष केले जात आहे. अवमान याचिकेविरोधात न्यायालयीन पुढील पाऊले उचलली जाणार असल्याचा इशारही यावेळी डिमेलो यांनी दिला. तसेच चौकशीसाठी समिती नेमावी अशी मागणीही केली.

 काही दिवसापूर्वी म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयात छापा टाकून फाईल्स जप्त केल्या होत्या. फक्त लोकांच्या डोळय़ात धुळ फेकण्यासाठी हे भासविण्यात आले. हे प्रकरण रोहन खवटे यांनी दडपविले असल्याचा दावाही ट्रोजन यांनी केला.

 रोहन खवटे घोटाळाची चौकशी करण्यासाठी  नेमलेल्या जी6 या समितीचे अध्यक्ष आहेत. तर गृहनिर्माण मंत्री जयेश साळगांवर हे या समितीचे सदस्य आहे. त्यांनीही या विषयावर निवडणूक लढविली होती. ते ही आता या प्रकरणात गप्प आहेत. त्यांनी भाजप आपले प्रकरण बाहेर काढतील ही भिती आहे, असा अरोप ट्रोजन यांनी केला.

Related posts: