|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राजस्थानच्या राजकारणातील जादूगार

राजस्थानच्या राजकारणातील जादूगार 

दोनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक गहलोत राजस्थानच्या मागास समुदायाशी संबंधित आहेत. त्यांचे वडिल लक्ष्मणसिंग गहलोत हे जादूगार होते. गहलोत यांनी देखील प्रारंभी याच पेशात नशीब आजमाविले परंतु राजकारणात ते अधिक यशस्वी ठरले आहेत. राजस्थानच्या जनतेवर आजही त्यांची जादू चालते. पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर यावा यासाठी गहलोत झटत आहेत.

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असून देखील गहलोत राजस्थानच्या निवडणुकीच्या रणांगणात स्वतःच पारंपांरिक मतदारसंघ सरदारपुरामधून उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसला बहुमत मिळाल्यास ते राजस्थानात मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य चेहरे ठरू शकतात.

महत्त्वाची जबाबदारी

काँग्रेसच्या संघटनेत राष्ट्रीय स्तरावर झालेल्या मोठय़ा फेरबदलावेळी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मार्च 2018 मध्ये गहलोत यांना पक्षात संघटन महासचिवाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यानंतर कर्नाटकात निजदसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यात देखील त्यांची महत्त्चाची भूमिका राहिली आहे. गहलोत हे इंदिरा, राजीव गांधी यांचे जवळचे सहकारी राहिले आहेत.

विद्यार्थी राजकारणापासून प्रारंभ

गहलोत यांचा जन्म 3 मे 1951 रोजी जोधपूरनजीक महामंदिर येथे झाला. गहलोत यांनी विज्ञान असेच कायद्यात पदवी प्राप्त करत अर्थशास्त्रातून एमए केले आहे. राजकीय जीवन त्यांनी काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना एनएसयुआयमधून सुरू केले. त्यांनी 1971 मध्ये पूर्व बंगालमधून आलेल्या लोकांकरता शरणार्थी शिबिरांमध्ये मोठे काम देखील केले आहे.