|Sunday, August 18, 2019
You are here: Home » उद्योग » आर्थिक विकासदर घटण्याचा अंदाज : फिच अहवालात नोंद

आर्थिक विकासदर घटण्याचा अंदाज : फिच अहवालात नोंद 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारताचा आर्थिक विकासदर सध्या वाढणार असल्यांच्या नोंदी सरकारी पातळीवर करण्यात येत असल्या तरीही येणाऱया आर्थिक वर्षांत या विकासदरात  घट होणार असल्याचे निरीक्षण जागतिक मुल्यमापन क्षेत्रात कार्यरत असणाऱया फिंच या संस्थेकडून नुकतेच नोंदवण्यात आले आहे.

चालु आर्थिक वर्षांत (2018-2019) मध्ये भारताची आर्थिक विकासदरातील वाटचाल 7.4 वरुन घसरण होत ती 7.2 टक्क्यांवर स्थीर राहणार असून या घटीचे कारण  नगदी पुरवठा कमी होत असल्याचे नोंदवत आर्थिक विकासदरात घट होणार असल्याचे असल्याचे म्हटले आहे.

आर्थिक वर्षं 2019-2020 मध्ये भारताचा आर्थिक विकासदर 7 टक्के आणि आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये 7.1 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अगोदर फिचकडून जूनमध्ये 2019-20 चा हाच विकासदर 7.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज मांडला होता.

भारताचा आर्थिक विकासदर संदर्भातील सादर करण्यात आलेले आकडे पाहता हे आकडे भारतीय बाजारातील नगदी पुरवठा कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आल्यानेच विकासदरात घट होत गेल्याची निरीक्षणे फिच संस्थेकडून मांडण्यात आली आहेत. जुलै-सप्टेंबरमध्ये भारताचा आर्थिक विकासदरात 7.1 टक्के राहिला असून एप्रिल-जूनमध्ये हाच दर 8.2 टक्क्यांवर राहिला होता.

रुपयात घट

भारतात पुढील वर्षात होणाऱया लोकसभा निवडणूकामुळे होणाऱया खर्चाचे प्रमाणातही मोठी वाढ होणार असल्याने 2019मध्ये रुपयाचे मूल्य 75 पर्यंत खाली घसरण्याचा अंदाज फिचकडून व्यक्त केला आहे.