|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » Top News » ठाण्यातील पाणी पुरवठा शुक्रवारी संपूर्ण दिवस बंद राहणार

ठाण्यातील पाणी पुरवठा शुक्रवारी संपूर्ण दिवस बंद राहणार 

ऑनलाईन टीम / ठाणे :

ठाण्यातील काही भागात आज मध्यरात्रीपासून 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधरे विभागाने हा निर्णय घेतल आहे. त्यामुळे ठाणेकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.

महाराष्ट्र  औद्योगिक महामंडळ व लघुपाटबंधरे विभाग यांच्यासोबत झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशीकरण येथून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी गुरुवार रात्री 12 वाजेपासून शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा, खारेगांव, पारसिकनगर, आतकोनेश्‍वरनगर, घोलाईनगर, रेतीबंदर, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर तसेच इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र. 1 या परिसराला एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असं आवाहन पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.

 

Related posts: