|Friday, May 24, 2019
You are here: Home » उद्योग » डायरेक्ट इक्विटीमध्ये भारतीयांची गुंतवणूक

डायरेक्ट इक्विटीमध्ये भारतीयांची गुंतवणूक 

वैयक्तिक संपत्तीत वाढ, कार्वीचा 2018 चा वेल्थ रिपोर्ट

प्रतिनिधी / पुणे

गेल्या काही वर्षांमध्ये संपत्तीवाढीला मिळालेली चालना कायम राखत, भारतातील वैयक्तिक संपत्ती आर्थिक वर्ष 2018 मध्ये 14.02… वाढून 392 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. यात वित्तीय संपत्तीतील 17.42… इतकी मोठी वाढ आणि भौतिक संपत्तीत 9.24… इतकी वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच भारतीयांनी गुंतवणुकीच्या बाबतीत डायरेक्ट इक्विटीला प्राधान्य दिले असून,  फिक्स्ड डिपॉझिटना मागे टाकले आहे. म्यूच्युअल फंड व पर्यायी गुंतवणूक या संपत्ती वर्गांनीही चांगली वाढ साध्य केली, तर गोल्ड ईडीएफमध्ये यंदा घट झाल्याची माहिती कार्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत भावे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कार्वी समूहाच्या संपत्ती व्यवस्थापन कंपनीने ‘इंडिया वेल्थ रिपोर्ट 2018’ची 9वी आवृत्ती प्रकाशित केली. गेल्या एका वर्षामध्ये संपत्तीनिर्मितीसाठी योगदान देणाऱया सर्व संपत्ती वर्गांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात भावे बोलत होते.

भावे म्हणाले, आर्थिक वर्ष 18 मध्ये, डायरेक्ट इक्विटी हा पसंतीचा संपत्ती वर्ग ठरला आहे. भारतातील वैयक्तिक वित्तीय संपत्तीतील एकूण संपत्तीमध्ये डायरेक्ट इक्विटीचा हिस्सा 0.7… आहे. येत्या पाच ते सात वर्षांमध्ये इक्विटी या संपत्ती वर्गाचे महत्त्व कमालीचे वाढणार आहे. इक्विटीच्या सकारात्मक कामगिरीमुळे पारंपरिक बँक ठेवींची टक्केवारी मात्र कमी झाली आहे. 

याशिवाय 2018 मध्ये म्यूच्युअल फंडमध्येही वाढ दर्शविली आहे. यात नियमित एसआयपी व एकरकमी गुंतवणूक याद्वारे 34.50… वाढ साध्य केली आहे.  याशिवाय पर्यायी गुंतवणुकीमध्ये असलेली व्यक्तींची संपत्ती 33.46… वाढली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीकडे कल नव्याने वाढला असून, आर्थिक वर्ष 18 मध्ये त्यामध्ये 25.83… वाढ झाली.

भौतिक संपत्तीच्या रिअल इस्टेट या संपत्ती वर्गाने सर्वोत्तम कामगिरी केली आणि अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 10.35… वाढ नोंदवली. 2023 पर्यंत भारतातील वैयक्तिक वित्तीय संपत्ती दुप्पटीहून अधिक, म्हणजे 517.88 लाख कोटी रुपये असणार असून, यात डायरेक्ट इक्विटी व म्युच्यूअल फंड यांचा अधिक वाटा असेल, अशी माहिती भावे यांनी दिली.

Related posts: