|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » फोर्ब्सच्या सूचीत चार भारतीय महिलांचा गौरव

फोर्ब्सच्या सूचीत चार भारतीय महिलांचा गौरव 

51 व्या स्थानी एचसीएलची रोशनी नाडर :फोर्ब्सकडून शक्तिशाली महिलांची यादी सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फोर्ब्सकडून गुरुवारी जागतिक स्तरावरील सर्वांत शक्तीशाली महिलांचा समावेश असणारी यादी सादर करण्यात आली आहे. त्यात भारताच्या चार शक्तीशाली महिलांचा सूचीत समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये एचसीएल कंपनीच्या सीईओ रोशनी नाडर, बायोकॉनच्या संचालिका किरण मुजूमदार शॉ , एचटी मीडीयाच्या डायरेक्टर शोभना भारतीया आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचा यात समावेश करुन गौरव करण्यात आलेला आहे.

शक्तीशाली लोकांची यादी सादर करण्यात येण्याचे यंदाचे 15 वे वर्ष असून मागील 15 वर्षांपासून ही सूची अखंडीतपणे सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर रोशनी यांना सदर सूचीत 51 वे स्थान प्राप्त झाल्याने ते आपल्यासाठी खुप गौरवास्पद असल्याचे म्हटले जात आहे. तर किरण 60 व्या क्रमांकावर, शोभना 88 व्या स्थानी तर प्रियांका चोप्रा यांचा या सूचीत 94 वा क्रमांक नोंदवण्यात आलेला आहे.

किरण व शोभना दुसऱयादा गौरव

किरण मुजूमदार आणि शोभना भारतीया यांचा शक्तीशाली महिलांच्या सूचीत या अगोदर 2015-16 मध्ये सादर करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या सूचीत समावेश करण्यात आलेला होता. तर 2017 च्या यादीत आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचाही या यादीत समावेश करण्यात आला होता.

सर्वोच्च स्थानी

जर्मनीच्या एन्जेला मार्केल यांचे स्थान सूचीत सर्वोच्च स्थानांवर असून दुसऱया क्रमांकावर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर तिसऱया क्रमांकावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालक क्रिस्टीन लेगार्ड यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

सलग 13 वेळा गौरव

फोर्ब्सकडून सादर करण्यात येणाऱया या सूचीत जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल यांचा सलग 13 व्या वेळी सदर सूचीत समावेश असून त्या सर्वोच्च स्थानांवर असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आलेला आहे.