|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चिनीमंडी मोबाईल ऍपव्दारे साखर उद्योगाला बळ

चिनीमंडी मोबाईल ऍपव्दारे साखर उद्योगाला बळ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महाराष्ट्रात डिजिटल क्रांती केली जात आहे. माहिती, तंत्रज्ञानामध्ये राज्याला आणखी सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ’चिनीमंडी मोबाईल ऍप’ साखर उद्योगाशी निगडीत असणारी सर्व माहिती शेतकरी, व्यापारी, साखर कारखान्यांसह शेअर बाजाराचा अभ्यास करणाऱया अभ्यासकांपर्यंत घेवून जाईल. त्यामुळे साखर उद्योगाला बळ मिळेल, असे प्रतिपादन माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजेंद्र चव्हाण यांनी केले.

चिनीमंडीच्या दाभोळकर कॉर्नर येथील कार्यालयात चिनीमंडी मोबाईल ऍपचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.

मंत्री चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी राज्यात सर्वार्थाने प्रयत्न केले जात आहेत. सध्या, या डिजिटल क्रांतीला अनुषंगिक असणारे साखर उद्योगाशी निगडीत सर्व माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषेत देण्याचे काम चीनीमंडी करत आहे. याच वेब पोर्टले पुढचे पाऊल म्हणून ‘चिनी मंडी मोबाईल ऍप’ कार्यरत राहिल व साखरेशी जोडलेले सर्व शेतकरी, व्यापारी आणी करखानदार यांना त्याचा लाभ होईल. 

संस्थापक उप्पल शहा यांनी प्रास्ताविक केले. हेमंत शहा यांनी सुत्रसंचालन केले. संचालक जीतू शहा यांनी आभार मानले. गौतम शहा, रितेश ठक्कर, हेमंत शहा, अजय पवार, डॉ. गुरूनाथ खानोलकर, यतीराज मर्दा, विजय नावनकर, विजय शहा, जसवंत शहा,  ए. का. गागरे