|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महामेळाव्याला तालुक्मयातील विविध गावांचा पाठिंबा

महामेळाव्याला तालुक्मयातील विविध गावांचा पाठिंबा 

वार्ताहर/ किणये

म. ए. समितीच्यावतीने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला तालुक्मयातील सीमाबांधव मोठय़ा संख्येने हजर राहणार आहेत. गेल्या दहा-बारा दिवसांपासून तालुक्मयातील अनेक गावांमध्ये महामेळाव्यासंदर्भात बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. यामुळे तालुक्मयात सोमवारी ‘चलो व्हॅक्सिन डेपो मैदान’ हा एकच नारा दिसणार आहे.

सीमाप्रश्नाच्या प्रत्येक लढय़ात बेळगाव तालुक्मयातील सीमावासीयांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. समितीच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱया प्रत्येक मेळाव्याला ग्रामीण भागातील महिला, शेतकरी व तरुणवर्ग नेहमीच आपली उपस्थिती मोठय़ा संख्येने दर्शवितात. सोमवारच्या महामेळाव्यासाठी तालुक्मयातील नागरिकांनी बहुसंख्येने हजर राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सीमाप्रश्नासाठी बेळगुंदी, कंग्राळी खुर्द येथील हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. सीमा आंदोलनामध्ये गावागावांमधील कित्येक जणांच्या तुकडय़ा सहभागी होत. पोलिसांचा लाठीमार खाल्ला आहे. अनेकांनी तुरुंगवासही भोगला आहे. यातील काही सीमासत्याग्रही दिवंगत झाले आहेत. तर काही जाणकार सीमासत्याग्रही आहेत. आपण महाराष्ट्रात जावे ही एकच त्यांची आस लागून राहिली आहे.

सीमालढय़ात आता चौथी पिढी सक्रिय झाली आहे. सीमाबांधवांचा महामेळावा आजही तितक्मयाच ताकदीनिशी होतो. हे आजवर झालेल्या मेळाव्याच्या माध्यमातून नक्कीच दिसून येते. महामेळाव्यासाठी म. ए. समिती तालुक्मयातील नेतेमंडळींनी विभागवार बैठका घेऊन जनजागृती केली आहे.

सीमाप्रश्नासाठी लढत राहू

सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी गेल्या 62 वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. आमचा लढा हा लोकशाही मार्गाने सुरू आहे. कर्नाटक सरकार नेहमीच सीमावासीयांवर अन्याय, अत्याचार करीत आले आहे. लढा सुटेपर्यंत आम्ही लढतच राहूया, असे मनोगत एपीएमसी सदस्य आर. के. पाटील यांनी वाघवडे येथे झालेल्या जनजागृती बैठकीत व्यक्त् केले. तसेच महामेळाव्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

यावेळी जोतिबा आंबोळकर, वसंत कदम, एम. टी. आंबोळकर, महादेव आंबोळकर, राजू दिवटगे, यल्लाप्पा मुसळे, नागेशी आंबोळकर, निलेश गोरल, महेश गोरल, सोपाना नाईक, बळवंत पाटील, महेश वाणी, नामदेव पाटील, रघु वाणी, एन. के. पाटील आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.

किणये परिसरातून महामेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. मोनाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अनिल पाटील, चांगाप्पा सांबरेकर, विनायक पाटील, ग्रा. पं. सदस्य पुंडलिक तारिहाळकर, सिद्धाप्पा पाटील, मल्लाप्पा पाटील, मल्हारी गोजेकर, मनोहर पाटील, तालुका पं. सदस्य आप्पासाहेब किर्तने आदी उपस्थित होते.

म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने तालुक्मयातील तरुणांनी महामेळाव्याला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटक सरकारने बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू केले आहे. या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी व तरुणांची एकी दाखविण्यासाठी प्रत्येकाने हजर रहावे, असे म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

तालुक्मयाच्या पश्चिम, दक्षिण, उत्तर व पूर्व भागात महामेळाव्यासंदर्भात जागृती करण्यात आली आहे. कार्यकर्ते, महिला, शेतकरी आदी मंडळी रविवारी रात्री महामेळाव्याला जाण्यासाठीचे आयोजन करताना दिसत होते. काही शेतकरी शिवारातील कामे बंद ठेवून महामेळाव्याला हजर राहणार आहेत.